Type Here to Get Search Results !

पोलिसांच्या गळ्यालाही मांजा’चा फास; ‘संक्रांत’ बेतली नागरिकांसह पक्षांच्या जिवावर

 

पुणे, दि. 16 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दरवर्षी संक्रांत (sankrant) सणानिमित्त शहरात नागरिक, लहान मुलांकडून डोंगर, टेकड्या, नदीपात्र, उड्डाणपूल, सोसायट्यांचे टेरेस अशा ठिकाणांहून पतंग (patang) उडविण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, काही व्यक्ती पतंग उडविण्यासाठी व एकमेकांमधील स्पर्धेसाठी पतंगासाठी नायलॉन, चिनी, तंगुस अशा प्रकारचा बंदी असलेला मांजाचा वापर करतात. यामुळे माणसेच नाही तर पक्षांनाही आपले प्राण काही वेळेस गमवावे लागतात.

अशाच काही घटना या संक्रांतीलाही घडल्या. संक्रांत सणानिमित्त अनेक नागरिक, मुलांनी रविवारी (दि.12 जानेवारी 2023) पतंग उडविण्याचा आनंद लुटला. मात्र, दुसरीकडे काहींनी पतंग उडविण्यासाठी नायलॉन, चिनी, तंगुस या स्वरूपाच्या मांजाचा वापर केला. परिणामी दुचाकीवरून जाणाऱ्या एका पोलिसाच्या मानेला मांजा अडकून ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्यासमवेतचा दुसरा पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला.

दरम्यान, शहरात रविवारी दिवसभरात अनेक पक्षी मांजामध्ये अडकल्याने जखमी (birds injured) झाले, पक्षीमित्रांनी त्यांची सुटका करीत त्यांना जीवदान दिले.

यापूर्वी मांजाने गळा कापल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, दौंड येथे दोन तरुणींसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी हजारो पक्षांचा मांजामुळे मृत्यू होतो. जखमी होण्याचे प्रमाणही मोठे आहे. रविवारी सकाळी नागपूर येथे एका 11 वर्षाच्या मुलाचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. असे असतानाही संक्रांत सणासाठी बाजारपेठेत दाखल होणाऱ्या मांजा विक्रीच्या घटनांवर पोलीस, महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी महेश पवार व सुनील गवळी हे दोघेही रविवारी त्यांच्या दुचाकीवरून सातारा रस्त्यावरील शंकरशेठ रस्त्यावरून जात होते. त्यावेळी मांजा मानेला अडकल्याने पोलीस कर्मचारी महेश पवार हे गंभीर जखमी झाले. तर त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी सुनील गवळी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पवार यांना उपचारांसाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात मांजामध्ये अडकल्याने घार, कावळा, कबुतर, पारवा, अशा पक्षांना दुखापत झाली. पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले यांनी कोथरूड येथील सर्वत्र सोसायटी येथे सकाळी ११ वाजता, बुधवार पेठेत दुपारी बारा वाजता व कसबा पेठ येथे दुपारी पावणे दोन वाजता मांजामध्ये अडकलेल्या तीन घारींची सुटका केली. मांजामुळे घारींचे पंखांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उडता येत नव्हते. ढमारे यांनी त्यांची मांजातून सुटका करीत कात्रज येथील प्राणी पक्षांच्या अनाथालयात उपचारांसाठी दाखल केले.

रविवारी मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. बंदी असलेला मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून गांभीर्याने कारवाई होत नाही. संक्रांत सण तोंडावर आला असताना आणि मांजाची विक्री पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तोंडदेखली कारवाई केली. आता मात्र मांजामुळे थेट पोलीस कर्मचारीच जखमी झाले असतांना पोलीस मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

“नागरिकांनी पतंग उडविण्याचा आनंद जरूर घ्यावा. मात्र, मांजाचा वापर करून सर्वसामान्य नागरिक, पक्षी, प्राणी यांच्या जिवाशी खेळ खेळू नये. आपण आनंद घेताना दुसऱ्यांच्या जिवाचा जरूर विचार करावा.” असे पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले म्हणाले.

असे अपघाताचे प्रकार होऊ नये यासाठी पतंगासाठी मांजा ऐवजी साधा दोरा वापरणे, नदीवरील पूल, उड्डाणपुलावरून दुचाकी सावकाश चालवणे, दुचाकी चालविताना गळ्याभोवती स्कार्फ किंवा मफलर गुंडाळणे, रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालवणे, कोठेही मांजा आढळल्यास त्याविषयी नजीकचे पोलीस ठाणे, अग्निशामक दलास माहिती देणे या प्रकारची काळजी आपण घेऊ शकतो.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.