पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कोयता गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र, असे असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचे नाव घेत नाही.
शहराचे याआधीचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 114 हून अधिक मोक्का अंतर्गत कारवाई केल्या आहे. आत्ता पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी देखील याची सुरुवात केली असून मी देखील मोक्का कारवाईचे शतक करणार असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले आहे.
शहरातील विविध ठिकाणी वाढत असलेल्या या कोयता गँग बाबत पोलिसांनी योग्य तो प्लॅन केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी कुमार यांनी सांगितले. तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून मागील 6 ते 7 वर्षापूर्वीचा गुन्हेगारांचा इतिहास काढून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे देखील कुमार यांनी यावेळी सांगितले.
33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 7 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत पुणे शहर येथे आयोजित करण्यात येणार असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कुमार यांनी माहिती दिली. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कोणत्या गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. पोलिसांकडून कोयता गँग वर कारवाई देखील केली जात आहे. मात्र असं असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना विचारले असता ते म्हणाले की मी जॉईन झाल्यानंतर 15 दिवसांपासून या कोयता गँगची ॲक्टीव्हीटी पाहत आहे. कालच एका गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
कोयता गॅंगचा असाच एक गुन्हा समोर आला आहे. पुणे शहरातील भवानी पेठेतील तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँग कडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. याबाबत लष्कर पोलीस पोलीस स्टेशन मध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार मोनिष म्हेत्रे हे त्यांच्या कुटुंबासह भवानी पेठेत राहत असून ते राहत असलेल्या बिल्डींगचे तळमजल्यावर त्यांच्या मालकीचे हॉटेल निशा रेस्टॉरेन्ट 388 भवानी पेठ घर नं 105 तळमजला हे खुप जुने आहे. हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू असते. हॉटेलमध्ये चहा नाश्ता इत्यादी खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. 5 जानेवारी 2023 ला नेहमी प्रमाणे आमचे हॉटेल उघडले व ग्राहकांना पदार्थची विक्री कामगार करत होते.
तक्रारदार मोनिष म्हेत्रे सांगितले की,”दुपारी साडे तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी असल्याने माझ्या हॉटेल मध्ये कामगार संतोष, आझीम हे हॉटेलमध्ये ग्राहक पाहत होते. मी हॉटेल समोर पार्किंगच्या ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी टू व्हीलर गाडीवरून पाच ते सहा मुले आली त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्याचे हातात लोखंडी कोयता, हॉकी व रॉड होते. ते आमचे हॉटेलमध्ये गेले त्यावेळी मी काउंटरवर दिसलो नाही. म्हणुन ते परत बाहेर आले व मला पाहून त्यातील तीघेजण माझ्या अंगावर पार्किंग मध्ये धावुन आले व त्यांनी मला शिवीगाळ करून मला म्हणाले की "तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का ?” त्याचे वय अंदाजे 25 ते 26 अंगाने सडपातळ अंगात जीन्स तोडावर रुमाल बांधलेले होते व हॉटेलच्या आतमध्ये दोन ते तीन जणांनी तोडफोड करून नुकसान केली व सर्वजण तिथुन निघुन जाताना माझ्याकडे रागाने मला पाहुन शिवीगाळ करुन निघुन गेले” दरम्यान घटनेचा तपास पोलीस करत आहे.
शहरातील विविध ठिकाणी कोयता गँगवर कारवाई करण्यात येत असून पुढील महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या गँगमध्ये जे अल्पवयीन मुले आहे त्यांच्यासाठी 2015 सालच जुनाएल जस्टिस बोर्ड मध्ये जाऊन ते प्रावधान वापरणार असल्याचे देखील पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84