Type Here to Get Search Results !

खडकवासला धरणाजवळील वळणावर पीएमपी बस दुचाकीची समोरासमोर धडक

 

पुणे, दि. 30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पीएमपी बस (PMP Bus) आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (gorhe budruk) हद्दीत ॲक्वेरिअस हॉटेल च्या समोर घडली आहे.

आदित्य राजेंद्र देशमुख (वय 22, रा. तनीष सृष्टी, आळंदी देवाची) आणि निलेश मल्लेश मित्रे (वय 22, रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी या अपघातात मयत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दि. 28 जानेवारी 2023 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस (एम एच 12 आर एन 9071) स्वारगेट (swargate) वरुन खानापूरकडे (khanapur) जात होती तर तरुण दुचाकीवरून डोणजे (Donje) बाजूकडून पुण्याच्या दिशेने येत होते. गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत खडकवासला धरणाला (Khadakwasla Dam) लागून असलेल्या ॲक्वेरिअस हॉटेल च्या समोर बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याला वळण असून पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी काळोख असतो. रस्त्याचे काम झालेले असल्याने वाहने अत्यंत वेगाने ये-जा करतात. रस्त्यावर कोठेही गतीरोधक नसल्याने वेगावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक वेळा अपघात झालेले असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

या अपघातात दोन्ही तरुण अत्यवस्थ होऊन पडले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दोन्ही तरुणांचे मृतदेह खाजगी रुग्णालयातून उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात (Sasun Hospital) पाठविण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कदम याबाबत अधिक तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.