पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): संसंस्कृत पुण्यात आजही समाजातून बहिष्कृत केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आंतरजातीय विवाह केला म्हणून 23 वर्षापूर्वी एकाला बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रकाश नेमीचंद डांगी (वय 46, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डांगी हे रिक्षा चालक असून ते श्री गौड ब्राम्हण समाजाचे आहेत. त्यांनी 1998 मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांच्या समाजाने त्यांना बहिष्कृत केले होते. त्याला ‘ओडबा देणे’ असे म्हटले जाते.
नुकताच त्यांच्या समाजाच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी ते बैठकीसाठी गेले होते. बिबवेवाडी येथील समाज मंदिरात ही बैठक होती. त्यावेळी आरोपींनी डांगी यांना तुला समाजाने बहिष्कृत केले आहे, तु येथे कसा आलास, तू निघून जा असे त्यांना सांगण्यात आले. तसेच, त्यांनी जेव्हा कार्यक्रमाची पत्रिका पाहिली त्याच्यात डांगी यांना त्यांचे नाव दिसले नाही.
सण उत्सवाच्या काळात देखील त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना दुर ठेवण्यात आले. जानेवारी महिन्यात समाजाचा स्नेहमेळावा पद्मावती येथील एका सभागृहात पार पडला. परंतु त्याचे निमंत्रण त्यांना दिले गेले नाही. जवळच्या नातेवाईकांच्या आनंदाच्या व दुखःच्या प्रसंगी देखील त्यांना हजर न राहण्याचा फतवा पंचानी काढला.
ते कोणत्याही कार्यक्रमास गेल्यास त्यांना अपमान सहन करावा लागत होता. डांगी यांनी चार ते पाच वेळा समाजात परत घेण्यासाठी राजस्थान येथील समाजाचे अध्यक्ष मोतीला शर्मा, भरत मावाणी यांना अर्ज केल्यानंतर त्यांनी डांगी यांना समाजात यायचे असेल तर 1 लाख 25 हजारांची अवास्तव दंडाची मागणी केली. त्यानंतर डांगी यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ताराचंद काळुराम ओझा (रा. गंजपेठ), भरत नेमीचंद मावाणी (रा. अरण्येश्वर), प्रकाश लालुराम बोलद्रा उर्फ शर्मा (रा. पद्मावती), संतोष उणेसा (रा. भवानी पेठ), मोतीला भोमाराम शर्मा डांगी (रा. खिवाडा, जि. पाली, राजस्थान), बाळु शंकरलाल डांगी (रा. पाषाण), प्रकाश आसुला ओझा (रा. पर्वती), भवरलाल डांगी (रा. मारवाड जंक्शन, राजस्थान) आणि हेमाराम ओझा (रा. सिनला, राजस्थान, जोधपुर) अशी गुन्हा दाखल करण्यात झालेल्यांची नावे आहे.
यामुळे पंचासह आठ जणांवर आता 2016 च्या समाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा कलम 6 आणि 7 नुसार तसेच भारतीय दंडसंहिता 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84