Type Here to Get Search Results !

माथाडी कामगाराच्या नावाखाली १ लाख २६ हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघे गजाआड

पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): माथाडी कामगाराच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या (crime department) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Squad) अटक केली.

याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने (businessman) खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार (complaint) दिली होती.

 

संकेत दिलीप गवळी (वय 29, रा. सुखवानी रॉयल, विमाननगर), अरुण शंकर बोदडे (वय 48, रा. भैरवनगर, धानोरी रोड) आणि नितीन एकनाथ कांबळे अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी संकेत गवळी आणि अरुण बोदडे या दोघांना अटक (arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲरो मॉल विमाननगर (vimanagar) येथील साहित्याचे लोडिंग अनलोडींगचे (loading-unloading) काम होते. त्यावेळी नोंदणीकृत माथाडी कामगार नसतानाही तिघांकडून लोडिंग-अनलोडिंग करू न देता गाड्यांची अडवणूक केली जात होती.

 

तसेच, कोणतेही काम न करता 1,26,000 रुपयांची खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार एका व्यावसायिकाने 24 जानेवारी रोजी पोलिसांकडे दिली होती. 12 ऑगस्ट 2022 ते 25 जानेवारी 2023 दरम्यान हा प्रकार घडला.

खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी या तक्रारीची दखल घेत दोन पथके तयार केली. या पथकाने आरोपींना तडजोडीअंती फिर्यादीकडून 26,000 रुपयांची खंडणी घेताना पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

 

गुन्हेगारी टोळ्या (criminal gang) अनधिकृत (unauthorised) माथाडी संघटना आणि माथाडींच्या नावाखाली व्यापारी, उद्योजकांना त्रास देत आहेत. हा त्रास होऊ नये, या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालयात बुधवारी बैठक (meeting) बोलावली होती.

औद्योगिक कंपन्या (Industrial companies), आयटी कंपन्या (IT companies), व्यापारी संघटना (trade association), चेंबर ऑफ कॉमर्स (chamer of commerce), इंडस्ट्रीज (industries), अॅग्रिकल्चर संघटनांचे (agriculture associations) उद्योजक प्रतिनिधी आदी या बैठकीत उपस्थित होते. यासोबतच नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशाखा कमिटी, वाहतूक समस्या आणि सरकारी खात्यांमधील तक्रारींबाबतही बैठकीत चर्चा झाली.

 

शहरात गुन्हेगारी टोळ्यांमार्फत खंडणी वसुली, तसेच काही माथाडी कामगारांकडून अवास्तव पैशांची मागणी केली जाते. वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, यावर आळा घालावा. माथाडी कामगारांचे मजुरीचे दर जाहीर करावेत. वाहतूक समस्येबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या वेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

त्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार (ritesh kumar) यांनी व्यापारी, उद्योजकांना खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित पोलीस उपायुक्त आणि पोलीस ठाण्यांनी उचित कारवाई करावी. तसेच, वाहतूक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क साधून ट्रॅफिक वॉर्डनची (traffic warden) संख्या वाढवावी, असे निर्देश वाहतूक पोलीस उपायुक्तांना दिले.

 

बैठकीत माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते (rajesh mate) यांनी माथाडी कामगार कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. या प्रसंगी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (sandip karnik) , अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (ramnath pokale) यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माथाडींच्या नावाखाली व्यापारी आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.