पुणे, दि.
27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रजासत्ताक दिनासाठी (republic day) लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर (pune station) बंदोबस्त करीत
असताना रेल्वे स्थानकावर अवैधरित्या पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी पुणे
रेल्वे पोलिसांकडुन गुजरातमधील (gujrat) एका व्यावसायिकाला (businessman) अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 24 जानेवारी 2023) ला घडली.
रेल्वे स्टेशनवर या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद (doubt) जाणवल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. हा व्यवसायिक गुजरातमधील सुरतवरुन महाराष्ट्रात आला होता. चौकशी करुन झडती (inspection) घेतली असता त्याच्याकडून परदेशी बनावटीचं पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे यांच्यासह जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या व्यक्तीकडे विनापरवाना पिस्तूल होती.
अनिलकुमार रामयज्ञ उपाध्याय (वय 47 वर्षे, रा. रामेश्वर रेसिडेन्सी, सुरत) असं अटक
केलेल्या आरोपीचं नाव आहे. या व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे पिस्तूल का
बाळगलं होतं, याचा तपास सध्या सुरु आहे.
या व्यावसायिकाच्या विरोधात पोलीस हवालदार निशिकांत
राऊत यांच्या तक्रारीनंतर पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोर्टाने व्यक्तीला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी
दिली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84