पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पत्नी सासरी नांदण्यास येत नसल्याच्या कारणावरुन एका एचआयव्हीबाधित (HIV) पतीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बिबवेवाडी (Bibwewadi) परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
हा प्रकार सोमवारी (दि. 23 जानेवारी 2023) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. पत्नीवर ससूण रुग्णालयात (sasun hospital) उपचार सुरू आहेत.
पती (वय 37) हा सोलापूर (solapur) जिल्ह्यातील माढा (madha) तालुक्यातील म्हैसगाव (mhaisgaon) येथील रहिवासी आहे. त्याची 27 वर्षीय पत्नी बिबवेवाडी येथील सुखसागरनगरला (sukhsagarnagar) राहते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती एचआयव्ही बाधित असल्यामुळे ती त्याच्याकडे नांदण्यास जात नव्हती. त्यामुळे पतीने पत्नीच्या छातीवर, दंडावर आणि गुप्तांगावर चाकूने वार करून जखमी केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे पत्नीने जबाब दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84