पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महिलांवरील अत्याचाराच्या (woman torture) घटना सातत्याने घडत आहे. पुणे शहरही यात मागे नाही. गुन्हेगारी वाढत असताना त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची संख्याही मोठी आहे. अलीकडेच पुण्यात एक विचित्र घटना घडली. पुण्यात विमाननगर (viman nagar) येथे राहणाऱ्या एका 24 वर्षीय मोठ्या बहिणीने (elder sister) आपल्या 18 वर्षाच्या बहिणीसोबत अश्लील कृत्य केले. याची तक्रार स्वतः लहान बहिणीनेच (younger sister) पोलिसांकडे केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान नगर भागात राहणाऱ्या कुटुंबातील ही घटना आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असले तरीही ती आपल्या वडिलांकडेच राहते. तर लहान बहीण बाराव्या वर्गात शिकत आहे. ती बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली असताना मोठी बहीण आतून आली आणि तिने लहान बहिणीच्या शरीरावरून अत्यंत अश्लील भावनेने (In vulgar sense) हात फिरवायला सुरुवात केली. या प्रकाराने लहान बहीण घाबरून गेली. तिने विरोध केला. त्यानंतर थोड्यावेळ वादावादी झाली. पण तरीही मोठी बहीण ऐकायलाच तयार नव्हती.
ती जबरदस्ती करायला लागली. यात संतापलेल्या लहान बहीणीने थेट विमानतळ पोलीस ठाणे गाठले. हा प्रकार घडला तेव्हा रात्रीचे 11:30 वाजलेले होते. लहान बहीण घाबरतच पोलीस ठाण्यात आली आणि तिने आपल्याच बहिणीची तक्रार केली, तेव्हा पोलिसांना आश्चर्य वाटले. घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. पण जेव्हा त्यांना घडलेला प्रकार कळला तेव्हा धक्काच बसला. एखाद्या बहीणीकडून एवढा अश्लील प्रकार घडत असल्याचे त्यांनाही वाईट वाटले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84