पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नामदार गोपाळ कृष्ण गोखले (namdar gopal krishna gokhale) रस्त्याच्या (फर्ग्युसन महाविद्यालय - एफसी रस्ता) दोन्ही बाजूने पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (encroachments) झाले असले तरी कारवाईकडे कानाडोळा केला जात होता. पण त्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीम सुरु केली आहे. (pune FC road encroachment News)
या रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांची संख्या कायम
वाढत आहे. अनेकांनी थेट पादचारी मार्गावरच छोटे स्टॉल (stalls) टाकून कपडे, पादत्राणे, ज्वेलरी तसेच सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. यातील अनेक
व्यावसायिकांची महापालिकेकडे कोणतीही नोंद नाही.
एफसी रस्ता हा फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित रस्ता
असला तरी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून त्याची कडक अंमलबजावणी केली
जात नाही. या स्टॉलच्या भोवती प्रचंड
गर्दी होत असल्याने आग लागल्यास किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढवू शकतो.
तसेच काही संघटनांनी प्रशासनाकडे या व्यावसायिकांच्या
वर्तनाबद्दल तक्रार केली आहे. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही कारवाई करू असा
इशारा दिल्याने आता प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. कारवाईत अडीच हजार चौरस फुटाचे बांधकाम
पाडले
गेले. 11 पथारी, 4 स्टॉल, 7 शेड, 4
काऊंटरवर कारवाई केली.
उपायुक्त माधव जगताप (madhav jagtap) म्हणाले,”फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा
व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. रस्त्यावरील काही परवानाधारकांनी
कारवाई विरोधात न्यायालयात अर्ज करून स्थगिती आणली आहे. हे व्यावसायिक वगळून इतर
सर्व व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. परवानाधारक स्टॉल्सचे योग्य जागी पुनर्वसन
केले जाईल.”
“फर्ग्युसन रस्त्यावर बेकायदेशीपणे व्यवसाय केला जात
आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याविरोधात
महापालिकेकडे व पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज कारवाई झाली. अशा
प्रकारे शहरातील इतर भागातही कारवाई करावी अशी मागणी आहे.” असे भाजप जी 20 चे शहराध्यक्ष अली दारूवाला (ali daruwala) म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84