पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राज्य सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नियुक्ती केल्याची घोषणा मंगळवारी (दि. 17 जानेवारी 2023) केली. (The state government on Tuesday (17 January 2023) announced the appointment of 20 members to the Pune District Planning Committee.)
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती बरखास्त करण्यात
आली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊनही जिल्हा नियोजन समितीवर
सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्याचा फटका जिल्हा नियोजन समितीच्या
माध्यमातून केल्या जाणार्या कामांना बसला.
याकारणाने पुणे जिल्हा नियोजन समितीवर 20 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात विधिमंडळ सदस्यांतून 2, जिल्हा नियोजनच्या कामकाजाचे ज्ञान असलेले 4, तर 14 विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
यामुळे जिल्हा नियोजन आराखड्यातील कामे टप्प्या-टप्प्यांनी मंजूर
करण्यात आली. विधिमंडळ सदस्यांमधून भीमराव तापकीर, राहुल कुल या आमदारांची नामनिर्देशित सदस्य म्हणून
नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा नियोजनच्या कामकाजाचे ज्ञान असलेले सदस्य म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि गणेश बीडकर यांची वर्णी लागली आहे.
जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी मंत्री
बाळा भेगडे, माजी
आमदार योगेश टिळेकर, आशा बुचके, भगवान
पोखरकर, वासुदेव काळे, राहुल पाचर्णे,
जीवन कोंडे, पांडुरंग कचरे, विजय फुगे, काळूराम नढे, प्रवीण
काळभोर, शरद हुलावळे, अलंकार कांचन आणि
अमोल पांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या सदस्यांमध्ये
दोन माजी मंत्री आणि माजी खासदारांबरोबर पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश
बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. बिडकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोघांचे निकटचे मानले जातात, त्यामुळे या महत्त्वाच्या समितीत त्यांना संधी मिळाली आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84