पुणे, दि. 16 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत मुदत संपणार्या,
तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींवर (grampanchayat)
प्रशासकांची नेमणूक (elect) करण्यात आल्याचे आदेश जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर पडल्याने प्रशासकांची नेमणुकीच्या
आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रशासक नियुक्तीचे
आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक
म्हणून ग्रामसेवकपदापेक्षा वरिष्ठ कर्मचारी प्रशासक म्हणून नेमण्याची तरतूद आहे.
त्यामुळे पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली
आहे.
शिरूर आणि खेडतालुक्यात ग्रामपंचायतींची संख्या प्रत्येकी एक, तर पुरंदर मध्ये दोन, वेल्हे आणि हवेलीत प्रत्येकी चार, आंबेगाव नऊ,
भोर दहा, मुळशी आणि मावळ प्रत्येकी 11,
बारामती 15, जुन्नर 19
अशी आहे.
प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958-59; तसेच ग्रामपंचायत लेखासंहिता
2011 मधील तरतुदीप्रमाणे सरपंचपदाचे अधिकार मिळणार आहेत.
मात्र, प्रशासकपदी नियुक्त केलेल्यांकडून कामात हयगय किंवा
गैरवर्तणूक झाल्यास प्रशासकांना पदावरून काढले जाईल, असे
स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84