Type Here to Get Search Results !

प्रेमविवाहानंतरही पतीने संशय घेत मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

 

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रेमविवाहानंतरही (love marriage)पतीने संशय घेत मोबाईल क्रमांक ब्लॉक (number blocked) केल्यामुळे एका विवाहितेने (married woman) गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. ही घटना कात्रज (katraj) येथील संतोषनगरमधील (santoshnagar) घुंगरुवाले चाळीत घडली.

या संदर्भात वडील राहुल देवराव माने (वय 48, रा. आंबेडकरनगर, यवतमाळ) यांनी फिर्याद (complaint) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश कुरेवार (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समीक्षा माने (वय 22) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. गळाफास घेतल्याची ही घटना 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आणि समीक्षा हे दोघे मूळचे यवतमाळ (yavatmal) येथील आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी घरी न सांगता प्रेमविवाह केला. ती शिक्षणासाठी पुण्यात राहत होती.

परंतु समीक्षा ही दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय (doubt) घेऊन तो तिला मारहाण (beating) करीत होता. तिला सतत त्रास देऊन त्याने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक (Mobile number blocked) केला. त्यामुळे या विवाहितेने घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा (case filed in bharti vidyapeeth police station) दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.