पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): “पुणे शहरात होणाऱ्या ‘जी 20’ची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहेत. येणाऱ्या पाहुण्यांचे पुणेकरांनी उत्साहाने स्वागत करावे. पण या काळात वाहतूक कोंडीमुळे आपली थोडीशी गैरसोय होईल, पण तो स्वागताचाच एक भाग मानावा,” असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील केले.
पुण्यात 16 आणि 17 जानेवारी रोजी ‘जी 20’ परिषदेच्या निमित्ताने बैठका होणार आहेत. यासाठी 37 देशातून सुमारे 150 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या मार्गाची पाहणी केली. रस्त्यात काही ठिकाणी थांबून सुर असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच काही सूचनाही दिल्या.
सुशोभीकरण, स्वागत आणि सुरक्षा या तीन मुद्द्यांवर ही पाहणी केली. सुशोभीकरणाची कामे पुढील दोन तीन दिवसात पूर्ण होतील. विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या दरम्यान मेट्रोची कामे 11 जानेवारीपासून बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,“‘जी 20’च्या पुण्यात तीन वेळा बैठका होणार आहेत. जानेवारी, जून आणि सप्टेंबर या महिन्यांत या बैठका होतील. परंतु यांच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत. शहरीकरण वाढत असल्याने पायाभूत सुविधा मजबूत करणे, वेगात काम कसे करावे याविषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहेत. त्यांचे कार्यक्रम महापालिका ठरवणार नाही, पण त्यांचे स्वागत करण्यामध्ये मोठा सहभाग असणार आहे.”
आपल्या देशाची प्रतिमा जगभरात जाणार आहे, त्यामुळे एरवीची टीका, राजकीय आक्षेप आता सहकार्यामध्ये बदलली पाहिजे. सुशोभीकरणासाठी पडदे लावले, इतर कामे केले तर त्यात गैर नाही. आपल्या घरात पाहुणे येणार म्हणून जसे घर आवरता. तसेच सध्याचे ‘जी 20’चे काम सुरू आहे.
‘जी 20’ च्या निमित्ताने गुंजन टॉकीज ते बंडगार्डन पूल आणि शिवाजीनगर ते पुणे विद्यापीठ या दरम्यानचे मेट्रोचे काम 11 जानेवारी ते 17 जानेवारी या दिवसांमध्ये बंद असणार आहे. याकाळात मेट्रोसाठी केलेली बॅरिकेटींग कमी करून जास्त रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असेल यासाठी प्रयत्न केला जाईल. तर इतर मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू राहिल.
“वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ते बंद नसतील, पण जे पाहुणे वेगवेगळ्या विमानाने पुण्यात येणार आहेत, त्यामुळे ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना जाण्यासाठी विशेष एक ट्रॅक खुला असेल त्यामुळे त्यांना वेगाने जाता जाईल व इतर वाहतूकही सुरू असेल,” असे पाटील यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84