पुणे, दि.
30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त (Mahatma Gandhi Death Anniversary) महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सामुदायिक प्रार्थना आणि ज्येष्ठ
पत्रकार आणि गांधी विचारांचे अभ्यासक अरुण खोरे (Arun Khore) यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी (Dr. kumar saptarshi) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी महात्मा गांधी लिखित ‘धर्मविचार भाग-1’ आणि ‘धर्मविचार भाग-2’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. (Dharmavichar book written by mahatma Gandhi published)
डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘‘महात्मा गांधी यांनी प्रश्न सोडविण्याचा
वेगळा मार्ग जगाला दाखवला म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व जगाला वाटते. त्यांचा विचार
संपणार नाही, ते ऑक्सिजनप्रमाणे अवतीभवती आहेत. महात्मा
गांधी यांना मारण्याचे सहा प्रयत्न झाले. पृथ्वी नष्ट करण्याच्या प्रयत्नांना
गांधीविचार हे उत्तर आहे. हाच संदेश महात्मा गांधी यांच्या धर्मविचार पुस्तकात
सांगितला आहे. आता महात्मा गांधी कोणत्याही पक्षातून निर्माण होणार नाही, मात्र सामान्य माणसातूनच पुढे येईल’’.
तर “महात्मा गांधी यांना बदनाम करण्याचे कट कारस्थाने
सुरू आहेत. गांधीजी, नेहरूजी
हिंदू होते, की मुसलमान हे महत्त्वाचे नाही, ते श्रेष्ठ भारतीय, श्रेष्ठ मानव आहेत,
हे महत्त्वाचे आहे. गांधी यांना मोठया प्रमाणात स्वीकारले गेले
आहे. हा विचारांचा ठसा अमीट आहे. हा वारसा पुढे नेला पाहिजे. काँग्रेसची जबाबदारी
अधिक आहे. त्यामुळे कॉंग्रेसने निष्प्रभ होऊन चालणार नाही.” असे प्रतिपादन खोरे यांनी केले.
डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, पुणे
शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड, आदित्य आरेकर, श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित
होते. अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84