पुणे, दि.
30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या वडीलांना शिवजी महानगर दंडाधिकारी कोर्टाने (Shivaji
Metropolitan Magistrate Court) मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी
प्रकरणात राणा यांचे वडील हरभजन सिंग (harbhajan singh)
कौर यांना शिवडी कोर्टाकडून (shivadi court) फरार (absconding)
म्हणून घोषित (declared) करण्यात आलं
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांच्यावर जात
प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला (fake certificate) दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणा
आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात (mulund police station)
तक्रार दाखल (Complaint filed) करण्यात आली
होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर फसवणूक करुन प्रमाणपत्र
मिळवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1000 रुपयांचा दंड (fine) ठोठावला आहे. सुप्रीम कोर्ट आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेलं प्रकरण दोन्हीही
वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवलं आहे.
कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे, या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी
जप्त (property confiscated) करण्यात येण्याची शक्यता
वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी
2023 ला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84