Type Here to Get Search Results !

युवकांनी राष्ट्रसेवा आणि राष्ट्र उभारण्यासाठी सर्वतोपरी योगदान देणे आवश्यक - दिलीप बराटे

 

पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संस्कार मंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे 17 जानेवारी 2023 रोजी मौजे खडकवाडी येथील नेर्लेकर माध्यमिक विद्यालयात मा. दिलीप बराटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (Special Winter Camp of National Service Scheme of Savitribai Phule Pune University and Sanskar Mandir College of Arts and Commerce was organized on January 17, 2023 at Nerlekar Secondary School in Khadakwadi. It was inaugurated by Dilip Barate.)

 

याप्रसंगी भगीरथ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे (Bhagirath Educational and Social Institute) प्रमुख श्री दत्ताभाऊ पायगुडे, सरपंच श्री संतोष तागुंदे, लक्ष्मणराव माताळे, श्री भरत पवार, प्राचार्य डॉ.राजेंद्र थोरात उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप बराटे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महात्मा गांधींच्या संकल्पनेनुसार श्रमाला मूल्य मिळावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा उदय झाला. युवकांनी राष्ट्रसेवा आणि राष्ट्र उभारण्यासाठी सर्वतोपरी योगदान देणे निकराचे आहे. आपल्या सर्वांच्या सहभागानेच आपण नवा सक्षम भारत घडवू शकतो.

 

संस्कार मंदिर महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्यासाठी घोडदौड करीत आहे. या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद  अभ्यास, व्यासंग, अध्ययन, अध्यापन, संशोधन करीत असून महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेत आहेत.

 

तसेच याप्रसंगी मा. दत्ताभाऊ पायगुडे म्हणाले,”महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील संस्कृतीचा अभ्यास करून शारीरिक श्रम आणि संस्कार आपल्या अंगामध्ये भिनवणे गरजेचे आहे. खरा भारत हा खेड्यामध्ये वसलेला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आगळंबे गावी जो बंधारा बांधला त्याचा निश्चितच उपयोग गावातील नागरिकांना झाला हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

शिबीरामध्ये ग्रामस्वच्छता, लोकप्रबोधन, सर्वेक्षण विद्यार्थी करणार असून तज्ज्ञ व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्दघाटन समारंभाचे प्रास्ताविक या उपक्रमाचे प्रमुख डॉ. दीपक शिंदे यांनी केले. डॉ. स्वप्निल गायकवाड यांनी सूत्रसंचालनाची धुरा अंगीकारली. प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात आणि उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भावे यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या तर आभार डॉ. प्रांजली विद्यासागर यांनी मानले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.