Type Here to Get Search Results !

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूकीत होणार बदल; प्रवास करणाऱ्यांनी ‘या’ बदलाकडे लक्ष द्या

 

पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University) ते गणेशखिंड (ganeshkhind) रस्त्यालगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे (Integrated double decker flyover) काम मुख्य चौकापासून काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी 2023 अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेड्सची (Security barricades) रुंदी वाढविण्यात येणार आहे.

विद्यापीठ चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी येथे पीएमआरडीएच्यावतीने दुमजली उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सर्वात वरून मेट्रो तर त्याखालून दुचाकी (2 wheeler) आणि चारचाकी (4 wheeler) वाहनांना वेगाने प्रवास करता येणार आहे.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. या प्रकल्पाचा भाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते गणेशखिंड रस्ता लगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी 2023 अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेडची रुंदी वाढविण्यात येणार आहे.

 

विद्यापीठ चौकातील हा बदल लक्षात घेऊन या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील रहिवासी, नागरिकांना पूर्वसूचना पीएमआरडीएकडून देण्यात येत आहे आणि या कामासाठी वाहनचालक (drivers) तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे (PMRDA) उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) यांनी केले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.