पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): इशरत जहाँ चकमकीवर लिहिलेल्या पुस्तकाच्या (book) जाहीर प्रकाशन (publication) कार्यक्रमाला पोलिसांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे संयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केला.
गुजरातमधील (gujrat) दंगलीत इशरत जहाँचे पोलिसांनी फेक म्हणजे बनावट एन्काउंटर केले असल्याचा आरोप आहे. 'इशरत जहाँ एन्काऊंटर' (isharat jaha encounter) असे या पुस्तकाचे नाव आहे. मुंबईतील अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतच इशरत जहाँ यांची आई शमिमा कौसर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे जाहीर प्रकाशन केले. पुण्यात मात्र पोलिसांनी या प्रकाशन कार्यक्रमालाच हरकत घेतली. (Publication of Ishrat Jaha Inkuntar book stopped in Pune.)
गुजरातची दंगल सन 2004 मध्ये झाली. त्यावरचे हे पुस्तक अलीकडेच मुंबईत प्रकाशित झाले. पुस्तकावर कसलीही बंदी नाही. त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. तो होऊ नये म्हणून कोण दबाव टाकत आहे, असा प्रश्न संयोजकांनी उपस्थित केला. पुस्तक ऊर्दूतून (urdu) असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. मूलनिवासी मुस्लीम मंचचे अध्यक्ष अंजूम इनामदार (anjum inamdar) तसेच समाजवादी मंचचे अनिस अहमद (anis ahmad)यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल (sandeepsingh gill) यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यात त्यांनी पुस्तक उर्दूत आहे, त्याची माहिती करून घेऊ, असे सांगितले. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या विषयावर करण्यात येणारे आंदोलन तूर्त स्थगित करत आहोत. मात्र, पोलिसांबरोबर पुन्हा चर्चा होणार असून, त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेण्यात येईल, असे अंजूम इनामदार व अनिस अहमद यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. 24 जानेवारी 2023) सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्मारकात हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी संयोजकांनी 21 जानेवारीलाच महापालिकेकडे भाडे जमा केले. त्याची पावती घेतली. सभागृहाचे आरक्षण झाले असल्याची नोंद करून घेतली. खबरदारी म्हणून खडक पोलीस ठाण्यालाही त्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील प्रमुख वक्ते असल्याचे कळवले.
सर्व तयारी असतानाही रविवारी सकाळी संयोजकांना अचानक महापालिकेच्या कार्यालयातून फोन आला. त्यात त्यांनी तुमचे पुस्तक संवेदनशील (sensitive) आहे. त्यामुळे प्रकाशनासाठी दिलेले सभागृहाचे आरक्षण रद्द करण्यात येत आहे. तुमचे पैसे परत घेऊन जावे, असे सांगण्यात आले. त्याही आधी कॅम्पमधील एका सभागृहाच्या संयोजकाने याच कार्यक्रमासाठी केलेले आरक्षणही संबंधित खासगी (private) हॉलच्या व्यवस्थापकांनी अचानक रद्द केले. त्यातून संयोजकांनी सभागृहासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सावित्रीबाई फुले स्मारकावर मंगळवारी दुपारपासून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
“कर्नल श्रीकांत पुरोहित याच्यावर मालेगाव बाॅम्बस्फोटसंबंधीचा खटला अजून सुरू आहे. न्यायालयाने त्याच्या युक्तिवादावर अलीकडेच ताशेरे मारले. त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचे काही महिन्यांपूर्वी एस. पी. कॉलेजमध्ये जाहीर प्रकाशन झाले. त्याला आम्ही विरोध केला होता. यातून त्याच्या न्यायप्रविष्ट खटल्याचे उदात्तीकरण होते असे आमचे म्हणणे होते. त्याकडे दुर्लक्ष करून पोलिस बंदोबस्तात हा कार्यक्रम घेण्यात आला. आता या पुस्तकाच्या कार्यक्रमाला विरोध करणे निषेधार्ह आहे.” असे मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजूम इनामदार यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84