Type Here to Get Search Results !

पुण्यात या आहेत तब्बल ४३ बेकायदेशीर शाळा; ३० शाळांना टाळे ठोकले

(43 schools have been found bogus in Pune district and action will be taken against the principal and management committee of these schools.)

पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 43 शाळा बोगस आढळल्या आहेत. 

या 43 पैकी 30 शाळा कायमच्या बंद करण्यात येत आहेत. या शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीवर कारवाई होणार आहे. पुण्यातली ग्रामीण भागातील शाळांचा बोगसपणा उघड झालाय. तालुक्यात सुरू आलेल्या सर्व अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापक, व्यक्ती आणि मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

याशिवाय ज्या 30 शाळा अनधिकृतरित्या सुरू होत्या, त्या शाळा बंद झाल्या आहेत. तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी दिला आहे. त्यापैकी काही शाळा मूळ परवानगी ठिकाण सोडून अन्यत्र भरत होत्या. आता त्या मूळ पत्त्यावर भरत आहेत. तसेच इतर शाळांना शासनाची परवानगी / मान्यता नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण अनधिकृत शाळांमध्ये एकूण 43 शाळांचा समावेश आहे. त्यापैकी 30 शाळा बंद तर 13 सुरु आहेत. दंड भरणा शाळा 4 आहेत आणि एकूण दंड वसुली 4 लक्ष एवढी आहे.

पुढील शाळांवर कारवाई करण्यात आली आहे -

1) ऑर्चीड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली

2) पुणे इंटरनॅशनल स्कूल, आष्टापुर मळा, लोणी काळभोर, तालुका हवेली

3) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल वीर, तालुका पुरंदर (परस्पर स्थलांतर)

4) संकल्प व्हॅली स्कूल, उरवडे, तालुका मुळशी

5) एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन, तालुका मुळशी

6) राहुल इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी, तालुका मुळशी

7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे/ सांगावडे, तालुका मुळशी

8) श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी नेरे, तालुका मुळशी

9) श्री. मंगेश इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, अशोकनगर, लिंगाळी रोड, तालुका दौंड (परस्पर स्थलांतर)

10) क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल कासूर्डी, तालुका दौंड

11) किडझी स्कूल, शालिमार चौक, दौंड

12) सुलोचना ताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, तालुका हवेली.

13) तक्षशीला विक्रमशिला इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, किरकटवाडी, तालुका हवेली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.