(37 Lakh tender for the paved road from Savitri Garden to Sinhagad road to DP road in Dhayri and work has started and esidents filed complaint against the same.)
पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): धायरी येथील सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता या
डीपी रस्त्याचे काम ज्या ठिकाणी करण्यात आले होते,
त्याच ठिकाणी पुन्हा नवीन निविदा (टेंडर) काढून काम सुरू करण्यात
आल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र, महापालिका
प्रशासनाने या ठिकाणी नव्याने काम करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
या
डीपी रस्त्याचे काम भूसंपादनासह विविध अडचणीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे.
महापालिकेने डीपी रस्त्यासाठी निधीही मंजूर केला होता. मात्र, अर्धवट कामामुळे पूर्ण निधी खर्च झाला नाही. आता या
रस्त्याच्या कामासाठी नव्याने 37 लाख रुपयांचा निधी मंजूर
करण्यात आला आहे.
यापूर्वी
केलेल्या रस्त्याच्या ठिकाणीच पुन्हा काम सुरू करण्यात आले असल्याची तक्रार काही
नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सुरुवातीचे काम मात्र पडून
आहे. मात्र, मध्यभागी रस्त्याचे
काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करून दगड, राडारोड्याचे भराव टाकले आहेत.
याबाबत
सिंहगड रोड विभागाचे उपविभागीय अभियंता नरेश रायकर म्हणाले,”या रस्त्याच्या
कामाबाबत नागरिकांनी केलेली तक्रार चुकीची आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या
निधीतून रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. अगोदर करण्यात आलेल्या
रस्त्याच्या ठिकाणी पुन्हा काम केले जात नाही. सर्व काम निविदेप्रमाणे केले जात
आहे.”
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84