पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारतीय सैन्यदल, हवाईदल आणि नौदलाला दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) अस्तित्वाची पुढील वर्षी 16 जानेवारी 2024 मध्ये 75 गौरवशाली वर्षे पूर्ण होणार आहेत. (national defense academy-NDA's 75th year debut in Pune)
गुरुवारी (ता. 19 जानेवारी 2023) म्हणून 75 वर्षांच्या बोधचिन्ह आणि थीमचे अनावरण करण्यात आले. अशाचप्रकारचे विविध उपक्रम वर्षभर एनडीएद्वारे आयोजित करण्यात येणार येतील.
एनडीए या प्रशिक्षण संस्थे मार्फत मित्र देशातील कॅडेट्सलाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत प्रबोधिनीने 38 हजाराहून अधिक कॅडेट्सला प्रशिक्षण दिले असून त्यात 32 मित्र देशातील एक हजाराहून अधिक कॅडेट्सचा समावेश आहे.
चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे अध्यक्ष एअर मार्शल बी.आर कृष्णा यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. एनडीएतर्फे 16 जानेवारी 2024 पर्यंत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये चर्चासत्र, सहली, नौकानयन मोहीम, रिव्हर राफ्टिंग, सुपर डिमोनो विमानावर क्रॉस-कंट्री उड्डाण, कार रॅली, मॅरेथॉन, क्रिडा स्पर्धा आदींचा समावेश आहे. तसेच देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडताना हुतात्मा झालेल्या एनडीएतील माजी विद्यार्थ्यांना या निमित्ताने आदरांजली वाहली जाणार आहे.
सशस्त्र दलाचे दोन सरसेनाध्यक्ष ते महत्त्वपूर्ण पदांवर भूमिका बजावणारे अधिकारी हे प्रबोधिनीतील माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे एनडीएच्या माजी विद्यार्थ्यांनी सशस्त्र दलांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून देशाचा अभिमान वाढवला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84