Type Here to Get Search Results !

राजगडाचा बालेकिल्ला उतरताना युवक पडला; सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने बचावले प्राण

 


पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): किल्ले राजगड (ता.वेल्हे) येथे पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा बालेकिल्ला उतरताना झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली. दरम्यान पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या तत्पर मदतीमुळे या युवकास वाचविण्यास यश आले आहे. चैतन्य संतोष किरवे (वय 17, रा. वरवे बुद्रुक ता. भोर) असे युवकाचे नाव आहे. (A youth who came for tourism at Rajgad Fort (Velhe) was seriously injured in an accident while descending the fort.)

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. 22 जानेवारी 2023) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला उतरुन सुवेळा माची कडे जात असताना दगडावरुन उडी मारताना पाय घसरून पडल्याने डोक्यास दगडाचा मार लागून चैतन्यला गंभीर दुखापत झाली.

याबाबतची माहिती मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ राजीवडे व रोहित नलावडे यांना समजली. त्यांनी त्वरित किल्ल्यावरील पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे, आकाश कचरे यांच्याशी संपर्क साधला. यांनी स्थानिक तरुण किरण शिर्के, रवी जाधव, संदीप दरडिगे यांच्या मदतीने सुवेळा माचीवरुन चैतन्य याला राजगडावरील शिवरायांच्या राजसदरेवर आणले होते.

दरम्यान स्थानिक कार्यकर्ते यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क केला जखमीला तातडीने स्ट्रेचर उपलब्ध करून गडावरून खाली आणण्यात आले. गडाच्या पायथ्याला तातडीने दाखल झालेले रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोरसे व मदतनीस ओंकार देशमाने यांनी चैतन्य याच्यावर प्राथमिक उपचार केले व त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

याविषयी डॉ. बोरसे म्हणाले,”चैतन्य याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. रक्तस्राव झाला आहे स्थानिक युवक व कर्मचारी यांनी केलेल्या तत्काळ मदतीमुळे उपचार मिळाल्याने चैतन्यचा जीव वाचला आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.