Type Here to Get Search Results !

अंदमानातील एका बेटाला देण्यात आले पुण्यातील वीर योद्ध्याचे नाव

 

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेकर वीरयोद्धा परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे (ram raghoba rane) यांचे नाव अंदमानातील एका बेटाला (Andaman island) देण्यात आले आहे. देशातील 21 परम वीर चक्र (param vir chakra) विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकताच घेतला असून त्या नामावलीत राणे यांचाही समावेश आहे. 1948 च्या भारत-पाकिस्तान युद्धात (1948 bharat Pakistan war) त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ त्यांना परम वीर चक्र प्रदान करण्यात आले होते.



अलिकडे म्हणजे 31 जानेवारी 2020 रोजी बॉम्बे सॅपर्सच्या (Bombay sappers pune) स्थापनेला 200 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात राणे यांच्या पत्नी राजेश्वरी राणे यांनी आपल्या पतीला मिळालेले परम वीर चक्र तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक (medal) घरात राहण्यापेक्षा लष्कराकडेच (army) राहिले तर अधिकारी आणि जवानांना त्यातून प्रेरणा (inspiration) मिळत राहील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

राम राघोबा राणे हे वयाच्या 22 व्या वर्षी त्या काळी असलेल्या ब्रिटिश इंडियन आर्मीच्या (British Indian Army) बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये (bombay engineer group kirkee pune) दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी गाजवलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट) पदी बढती मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राणे यांची नियुक्ती बॉम्बे सॅपर्समध्ये करण्यात आली. त्यांना सेकंड लेफ्टनंट (second leftnant) हे पद देण्यात आले.

 

1948 च्या भारत पाकिस्तान युद्धात राजौरी (rajauri), नौशेरा (naushera) परिसरात त्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव म्हणून त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. 1958 मध्ये ते मेजर म्हणून निवृत्त (retired) झाले. त्यानंतर 1958 ते 1971 पर्यंत राणे पुनर्नियुक्तीवरील अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत राहिले. 11 एप्रिल 1994 रोजी पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात (Southern Command Hospital) त्यांचे निधन (death) झाले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.