पुणे, दि. 31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पथदिव्यामध्ये उतरलेल्या विजेचा शॉक (electricity shock) लागून वारजे (warje) मध्ये एका शालेय विद्यार्थ्याला प्राणाला मुकावे लागले होते. तशीच घटना पुन्हा एकदा होता होता वाचली असून, पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत वारजे मधील सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. 29 जानेवारी 2023 च्या रात्री वारजे रामनगर (ramnagar) मधील भीमशक्ती चौक (bhimshakti chowk) भागात एक पथदिव्यामध्ये विजेचा करंट लागत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी नागरिकांनी अर्चना आणि पराग ढेणे (archana dhene and parag dhene) यांच्याकडे याबाबत तक्रार कळवताच, त्यांनी त्वरित विद्युत विभागाशी संपर्क साधत, सदरील पथदिव्याचा विद्युत पुरवठा बंद केला. तर सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी शॉक लागण्याचे कारण शोधत, तुटलेली तार दुरुस्त करून पथदिवा पूर्ववत सुरु करण्यात आला.
अनेक वेळा पथदिव्याला वीज पुरवठा करणारी तार तुटल्यामुळे किंवा अजून काही कारणास्तव पथदिव्यामध्ये विजेचा करंट वाहू लागतो. अशा परिस्थितीत रस्त्याने जाता येता कुणाचाही हात लागून विजेचा धक्का (electric shock) बसण्याचा धोका असतो. त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामनगर हा झोपडपट्टी भाग आहे. इथे शॉर्ट सर्किट सारखी घटना घडून आगीसारखी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असणार? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84