पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): धर्मांतर, गोहत्या आणि लव
जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी. धर्मवीर छत्रपती
संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस “धर्मवीर दिन” म्हणून साजरा करावा, या
मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने
उद्या रविवारी दि. 22 जानेवारी 2023 रोजी “हिंदू
जन आक्रोश मोर्चा”चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा मध्ये 30 हजार पेक्षा अधिक हिंदू नागरिक सहभागी होतील, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. (For Strict laws to be made and strictly implemented for religion conversion, cow slaughter, love jihad and the sacrifice day of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj should be celebrated as 'Dharmaveer Day', tomorrow "Hindu Jan akrosh Morcha" is organised by sakal hindu samaj.)
या हिंदू आक्रोश मोर्चा मध्ये
आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, 'तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, हिंदूराष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे. त्याचबरोबर
इतरही सर्व हिंदुत्ववादी संघटना या मोर्चा मध्ये सहभागी होणार आहेत. मोर्चाची
सुरुवात उद्या रविवारी दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता लाल महाल येथून होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून
लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या
स्मारकाजवळ पोहोचणार आहे.
हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल.
शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात
सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू
समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार असल्याचे विश्व हिंदू परिषदचे किशोर
चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल
नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश
भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश
पवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84