पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): ‘सकल हिंदू समाज’च्या वतीने
येत्या रविवारी (दि. 22 जानेवारी 2023) हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
करण्यात आले असल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी आज पत्रकार
परिषदेत दिली. (For strict laws against religion conversion, cow slaughter and love jihad and for demands that Sambhaji Maharaj's sacrifice day be celebrated as Dharmaveer Day there will be a Hindu Jan Awach Morcha on this coming Sunday (i.e. 22nd of jan 2023) on behalf of the 'Sakal Hindu Samaj')
हिंदू
गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री. शंभू चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृशक्तीच्या
नलिनी वायाळ, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ
प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर
यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पवळे
म्हणाले,”या मोर्चाची गेल्या
एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल. शहरातील राजकीय
पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी,
गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि
युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन
होणार आहे. तेलंगाणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे
वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय
देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.”
भिसे
म्हणाले,”धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी
करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून
साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.”
घाटे
म्हणाले,”रविवारी सकाळी 10 वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई
गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी
महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल.”
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84