पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सख्ख्या काकानेच दोन अल्पवयीन पुतणींवर अत्याचार केला. ही घटना भवानी पेठेत घडली. (in bhavani peth, uncle abused two minor nephews with his friend.)
इरफान आतिक (29) आणि मोहम्मद धोबी (40) यांना
पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसात तक्रार दिली. खडक पोलीस
ठाण्यात आरोपींच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन
पीडित अल्पवयीन मुली या प्रकरणातील एका आरोपीच्या सख्ख्या पुतण्या आहेत. हा सगळा
प्रकार गेल्या 20 ते 22 दिवसांपासून
सुरू होता. यातील एका पीडित मुलीचे वय 14 असून दुसऱ्या पीडित
मुलीचे वय 10 आहे. असून त्या दोघी बहिणी आहेत. या दोन्ही
मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. मुली लहान असल्याकारणाने
त्यांनी या दोघींना काकाकडे रहायला पाठवले होते.
दरम्यान घरी असताना काकाने
वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले. यावरच हा नराधम
थांबला नाही तर त्याच्या मित्रानेसुद्धा या दोन्ही मुलींशी जबरदस्तीने शारीरिक
संबंध ठेवले.
गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने यातील एका मुलीने पोटात दुखत असल्याचे शेजारी राहत असलेल्या लोकांना सांगितले आणि यातूनच आज सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
हा सगळा प्रकार एका समाजसेविकेने पोलिसांना सांगताच
पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि यातील दोघाही जणांना अटक केली आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84