Type Here to Get Search Results !

उड्डाणपूलाचे काम पूर्ण झालेले नसताना घाईघाईत उद्धाटन का? आम आदमी पार्टीचा सवाल

 

पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): येरवडा (yerwada) येथील नव्याने उद्घाटन केलेल्या धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूलावर (dharmaveer sambhaji maharaj flyover) लावण्यात आलेल्या अंदाजे तीस चाळीस किलो वजनदार असलेला दिशादर्शक फलक (direction board) कमकुवत वेल्डींगमुळे उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या वाहनांवर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ एका तारेच्या साहाय्याने हा दिशादर्शक फलक आधार धरून आहे. मात्र उड्डाणपूलाचे काम पूर्ण झालेले नसताना घाईघाईत उद्धाटन (inauguration) का करण्यात आले असा प्रश्न निर्माण होतो.

यासंदर्भात आम आदमी पार्टीचे (aam aadmi party pune) मनोज शेट्टी (manoj Shetty) म्हणाले की,”ही बाब गंभीर असून काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? त्यामुळेच वाहतूक विभाग व पुणे महानगरपालिकेने त्वरित संपूर्ण पुलाची पाहणी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व राहिलेल्या कामांची डागडुजी करून घ्यावी अन्यथा आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

यासंदर्भात ”उद्घाटनापूर्वी काम अगदी पूर्ण करण्यात आले होते. परंतु नंतर नागरिकांनी तेथील लोखंड कापून नेण्याचा प्रयत्न केल्याने त्याची अशी अवस्था झाली आहे. ही बाब लक्षात येताच तेथे दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.” असे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर (abhijit aambekar) म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.