पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): तळेगाव-दाभाडे येथील कुख्यात गुन्हेगार संजय कारले याच्या हत्येचं गुढ अखेर उकललं आहे. नवी मुंबईचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळा अभयारण्याजवळ पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बंद ऑडी कारमध्ये मावळमधील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कारले ( रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याचा मृतदेह आढळून आला होता.
याबाबत तपास सुरु केल्यानंतर ही गाडी पुण्यावरुन आल्याचं स्पष्ट झालं. मयत आणि संशयित आरोपी यांच्यात पैशांवरुन वाद झाले होते. कमी किमतीमध्ये जास्त सोनं देतो असं सांगून साडे पाच लाख रुपये संशयित आरोपींकडून कारले याने घेतले होते. त्यानंतर भेटायला आल्यावर आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. पण कोणतही सोनं न दाखवता आणखी कसले पैसे मागतोस, यावरुन यांच्यामध्ये वाद झाला.
संजय कारलेचा फसवणूक करण्याचा उद्देश लक्षात येताच संशयित आरोपींनी स्वतःजवळील पिस्तुलमधून पाच गोळ्या झाडून हत्या केली. खून करुन दोन्हीही संशयित आरोपी पनवेलवरुन सातारा, तिथून बंगळुरु, जोधपूर, कोलकता आणि तिकडून नेपाळला पळून गेले होते.
जवळपास ४५ दिवसांनंतर या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे अशी आरोपींची नावं आहेत. मात्र आज संशयित आरोपी मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे पुण्यात येताच पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. मृत संजय कारले आणि दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं यावेळी अमित काळे यांनी सांगितलं.
संजय कारलेवर तळेगाव - दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2018 भादवि कलम 420, 354, 506 व मोका अन्वय गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यात नमूद आरोपी हा सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त झाला होता आणि त्यानंतर त्याला कायमस्वरूपी जामीन मिळाला होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84