पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या आठ दिवसापासून पुण्याच्या तापमानात घट होत आहे. रविवारपासून तापमान घसरले असून थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वेटर, मफलर, टोपी पुन्हा बाहेर काढले आहे.
विशेष म्हणजे सारसबागेतील गणपतीला देखील दरवर्षी प्रमाणे रोज संध्याकाळी सातच्या नंतर लोकरीचा स्वेटर आणि टोपी परिधान केली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी काढली जाते. रोज रात्री आणि सकाळी दाट धुक्याच्या थंडमय वातावरणात स्वेटरमधील बाप्पाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. या गणपती बाप्पाला तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाते.
काल नववर्ष 2023 मधली पहिली अंगारकी चतुर्थी असून सकाळी गणपतीची पुजा करून दर्शनाला भाविकांनी सुरुवात केली होती. पुण्यातील सर्वच गणपती मंदिराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर श्रीगणेश भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यातीलच हे एक सारसबागेतील तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. काल पहाटेपासूनच अंगारकी चतुर्थी निमित्त या ठिकाणीही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84