Type Here to Get Search Results !

पैलवान मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

 

पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात (Shivajirao Bhosale Cooperative Bank Embezzlement Case) मागील 21 महिन्यांपासून कारागृहात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Bombay High Court has granted bail to the former construction chairman of Pune Zilla Parishad, Mangaldas Bandal, who has been in jail for the past 21 months in the Shivajirao Bhosale Cooperative Bank Embezzlement Case in Pune.)

विशेष म्हणजे या प्रकरणातील अटक असलेल्या सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.18 जानेवारी 2023) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी झाली. यात बांदल यांच्यासह त्यांच्यासोबत अटकेत असणाऱ्या सर्वांचा जामीन न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती अ‍ॅड. आदित्य सासवडे (Adv. Aditya Saswade) यांनी दिली.

याबाबत शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे (Dattatray Mandre) यांनी 21 एप्रिल 2021 रोजी तक्रार दिली होती. मांढरे यांच्या तक्रारीवरुन मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या तक्रारीवरुन बांदलांसह त्यांच्या जवळचे मित्र व काही बँक अधिकाऱ्यांना अटक (Arrest) झाली होती. त्यानंतर अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. बांदल यांच्यावर एकूण पाच गुन्हे (FIR) दाखल झाले होते.

दरम्यान, न्यायालयाच्या वेबसाईटवर न्यायालयीन आदेश अपलोड झालेला नाही. त्यामुळे आदेश अपलोड झाल्यानंतर सर्वांची नावे जाहीर होतील. जामीन प्रक्रियेला आणखी चार ते पाच दिवस लागतील. यानंतरच बांदल आणि इतर बाहेर येतील अशी माहिती अ‍ॅड. अदित्य सासवडे यांनी दिली.

बांदल यांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी (Senior Advocate Ashok Mundargi), अ‍ॅड. आबाद पोंडा (Adv. Abad Ponda), अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम (Adv. Aniket Ujjwal Nikam), अ‍ॅड. तपन थत्ते (Adv. Tapan Thatte) व अ‍ॅड. आदित्य सासवडे यांनी कामकाज पाहिले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.