Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

 

पुणे, दि. 30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): डोळा नाजूक अवयव असल्याने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या डोळ्यांचे आरोग्य (eyes health) टिकवुन ठेवण्यासाठी दृष्टी दृढ ठेवण्यासाठी त्यांची निगा घेणे आवश्यक आहे. वाढता मोबाईल कम्प्युटरचा वापर हा मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरत आहेत. कोरोनाकाळात (corona) अगदी लहान-लहान मुलांच्या हातात अभ्यासासाठी मोबाइल दिला गेला, पण त्याचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम झाला.

दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था (Divankur Multipurpose Social Service Institution) व स्प्रिंग व्हीजन (spring vision) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. विद्या भवन इंग्लिश मिडीयम हायस्कूल पिरंगुट (shree vidhya bhawan English medium highschool ,pirangut) येथे डोळे तपासणी शिबीर (Eye checkup camp) घेण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून नेहमीच असे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. पुणे जिल्ह्यातील शाळा व कॉलेज मध्ये मोफत नेत्र तपासणी (free eye checkmup) व चष्मे वाटप (specs distribution) उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे, असे मत संस्थेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई म्हस्के (archanantai mhaske) यांनी मांडले.

 

पाच इंद्रियांपैकी एक अतिशय संवेदनशील अवयव म्हणजे आपले डोळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य टिकवुन ठेवण्यासाठी दृष्टी दृढ ठेवण्यासाठी त्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे हा विचार सत्यात आणण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ सुचित्रा साठे मॅम (suchitra sathe) यांनी संस्थेच्या या उपक्रमांस सहमती दर्शविली, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा त्या नेहमीच विचार करत असतात.

 

यावेळी संस्थेचे संस्थापक लक्ष्मण म्हस्के (lakshman mhaske), युवा उद्योजक महेश माने (Mahesh mane) उपस्थित होते. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, इतर कर्मचारी यांचे खुप छान सहकार्य लाभले. तसेच शाळेचे कर्मचारी शिक्षक, मावशी, मामा इतर कर्मचाऱ्यांचे डोळे तपासणी देखील करण्यात आली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.