Type Here to Get Search Results !

गुरुकृपा आणि सोहनताराकडून व्यसनमुक्ती केंद्रात गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात साजरा

पुणे, दि. 31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खानापूर (khanapur) येथील योगदा व्यसनमुक्ती केंद्रात (yogda vyasanmukti Kendra) गुरुकृपा संस्था (gurukrupa sanstha) आणि सोहनतारा फाउंडेशन (sohantara foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने 'जीवन के रंग, संग सुरीली सरगम' हा गाण्यांचा कार्यक्रम (singing) सादर करण्यात आला. गुरुकृपा संस्था 1994 पासून सामाजिक क्षेत्रात (social work) कार्यरत आहे.

गुंजा सहाय, प्रसाद लोणकर, सुजाता चौहान यांनी झकास गाणी गायली. ही सगळी गाणी ऐकून तेथील रूग्ण उत्साह आणि आनंदाने ऊर्जामान झाले. त्यांच्यापैकी संजय कदम (Sanjay Kadam), दिलीप माळी (Dilip Mali) यांनी तसेच समुपदेशिका प्रियांका जोशी (Priyanka Joshi) यांनी गाणी म्हटली. राजेंद्र किरवे (Priyanka Karve), दिपाली किरवे (Dipali Karve) यांची उत्तम ध्वनीव्यवस्था होती. सर्वच रुग्णांनी गाण्यांच्या ठेक्यावर नाच केला. अनिता देवकर व स्वप्निल लोहकरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या साहिल, कालिदास, अर्जुन, मनीषा इत्यादी कर्मचाऱ्यांनी पुष्कळच सहकार्य केले.

निवेदक प्रशांत थोरात (Prashant Thorat) यांनी,"व्यसनी व्यक्तींना चांगल्या संगीताचा, चांगल्या संगतीचा आणि सहानुभूतीचा आधार दिला, तर त्या व्यसनांमधून बाहेर नक्कीच येऊ शकतात." हे प्रतिपादन  केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.