पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगडावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या (Waste treatment plant) साडेसात लाख रुपयांच्या मशिनरी (machinery) चोरी प्रकरणात स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यासह (local seller) सहा चोरट्यांचा सहभाग असल्याचे नुकतेच पोलीस तपासात (police investigation) निष्पन्न झाले.
गडावरील
चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता सुनील शिवाजी
चव्हाण (वय 23, रा. मोरदरी, ता. हवेली) असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्याच्यासह आकाश काळुराम
चव्हाण, दादा बबन चव्हाण, शुभम रोहिदास
भंडलकर, शंभू दत्तात्रय शितकल व सहिमुद्दीन सज्जाद अली यांना
पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. यानंतर वन खात्याने गडाच्या सुरक्षेसाठी रविवार
(दि. 22 जानेवारी 2023) पासून
उपाययोजना सुरू केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ (Forest Range Officer pradeep sakpal) यांनी दिली.
मिळालेल्या
माहितीनुसार, गडावरील वाहनतळावर कड्यालगत उभारण्यात आलेल्या शेडमध्ये कचरा
प्रक्रिया प्रकल्पाची मशिनरी बसविण्यात आली होती. गेल्या महिन्यात 18 ते 22
डिसेंबर 2022 यादरम्यान चोरट्यांनी मशिनरी व साहित्य चोरून
नेले. हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही चोरट्यांचा शोध लागला नाही.
त्यामुळे स्थानिक आमदार भीमराव तापकीर (Local MLA bhimrao tapkir) यांनी चोरट्यांचा शोध न लागल्यास रस्त्यावर
उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
याचीच
दखल घेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी
वरील सहा जणांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने गडाच्या सुरक्षेसाठी (sinhagad security) विविध उपाययोजना आखल्या असून, त्यांची अंमलबजावणी रविवारपासून सुरू केल्याचे सकपाळ यांनी सांगितले.
यापूर्वीही
सिंहगडावर डांबर, लोखंडी आदी साहित्य
चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, चोरट्यांचा शोध लागला
नव्हता. मात्र, कचरा प्रकल्पाच्या मशिनरींच्या चोरीबाबत
तापकीर यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि
याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
आमदार
भीमराव तापकीर म्हणाले,”सिंहगडावर कचरा प्रक्रिया प्रकल्पाची गरज आहे का? याचा
अभ्यास न करताच लाखो रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला. स्थानिक वन व्यवस्थापन समिती,
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वन विभागाने निर्णय घेणे गरजेचे
आहे.”
याबाबत
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले कि,”सिंहगडावरील कचरा
प्रकल्पाची यंत्रसामग्री चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
गडाच्या सुरक्षेसाठी वन विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
यापुढे सायंकाळी सहानंतर सिंहगडावर प्रवेशबंदी असणार आहे.”
तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे म्हणाले,”सिंहगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, वनसंपदा, मालमत्तेचे जतन व्हावे, यासाठी स्थानिक रहिवाशांनी पुढे यावे. गडामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गडाचे संरक्षणही महत्त्वाचे आहे.
गडावर
पुढील उपाययोजना (security measures) केल्या गेल्या आहेत...
·
गडावर तसेच
गडाच्या दोन्ही मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविणे.
·
किल्ल्यावरील
खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह स्थानिकांना ओळखपत्र (identity card) देणे.
·
कोंढणपूर-
अवसरवाडी मार्गावर गेट (entry gate) बसविणे.
·
गडावर चोवीस
तास पाहरा तैनात (24-hour guard on fort) ठेवणे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84