Type Here to Get Search Results !

सोलापूर कोर्टातील सुनावणीला गैरहजर राहण्याची धमकी देत महिलेला पेटवण्याचा प्रयत्न; पुण्यात गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेवर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंढव्यात घडली. याबाबत एका 38 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत महिला बचावली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (An attempt was made to set a woman on fire at mundhwa solapur by pouring petrol on her to withdraw her complaint of rape.)

त्यावरून पोलिसांनी रमजान खलिल पटेल (वय 60, रा. भीमनगर, मुंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पतीपासून विभक्त राहतात. न्यायालयातील कामानिमित्त त्यांची रमजान पटेल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने या महिलेला 2018 मध्ये बार्शी येथे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी महिलेने रमजान पटेल याच्या विरोधात पांगरी (जि. सोलापूर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

हा खटला सोलापूर न्यायालयात दाखल आहे. या खटल्याची सुनावणी सुरू असून, येत्या 23 जानेवारी 2023 ला त्याची तारीख आहे. दरम्यान, पटेल याने बुधवारी (दि. 18 जानेवारी 2023) सकाळी 11 च्या सुमारास महिलेला सोसायटीच्या आवारात गाठले. गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेला शिवीगाळ केली. बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या शरीरावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु अंगाची आग होऊ लागल्याने महिलेने तेथून पळून स्वत:चा जीव कसाबसा वाचविला. या घटनेनंतर पटेल हा पसार झाला.

मुंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.