Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्याच्या महानाट्यातून उलगडली भारताच्या वैभवशाली इतिहासाची अमृतगाथा

 

(SPM English School students performed drama titled 'swatantyarchi amrutgatha' and around 1100 students participated in this play)

पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्राचीन भारतातील चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, 1857 चे स्वातंत्र्यसमर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांचे कार्य महानाट्याच्या माध्यमातून पुणेकरांसमोर उलगडले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राचीन भारतापासून ते अगदी आजपर्यंतच्या भारताचा वैभवशाली इतिहास 'स्वातंत्र्याची अमृतगाथा' या महानाट्यातून पुण्यात तब्बल 1100 विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर सादर केला. 

 

शि.प्र.मंडळीच्या एस.पी.एम.इंग्लिश स्कूल सदाशिव पेठ तर्फे स्वातंत्र्याची अमृतगाथा या महानाट्याचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या हॉकीच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका वीणा देव, अभिनेता विराजस कुलकर्णी, रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शि.प्र.मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, सतिश पवार, नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर, सुनील जोशी, राजेश पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

 

सलग 2 तास 15 मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभविली. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य देखील नाटकातून उलगडण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर महिला सबलीकरण, हरितक्रांती, उद्योगधंद्यांचा विकास, अण्वस्त्र चाचणी, इस्त्रो, भारतीय सैन्य यापासून ते भारतीय अध्यात्म असे अनेक आयाम हे नाटयप्रसंगातून सादर झाले.

 

एस.पी.एम.इंग्लिश स्कूलच्या बालवाडी ते 9 वी पर्यंतचे 1100 विद्यार्थी व विद्यार्थीनी यामध्ये सहभाग घेतला. महानाट्यामध्ये नांदी, भारुड, बुरगुंडा, पोवाडा, सवालजवाब, मंगळागौरीचे खेळ, धनगरी नृत्य, शेतकरी नृत्य, वारीचे अभंग, बतावणी आदींद्वारे भारतीय लोककलेचे दर्शन देखील झाले. महानाटयाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची आहे. माजी नगरसेवक धीरज घाटे यांसह अनेकांनी महानाट्यकरिता विशेष सहकार्य केले. महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन मिनाक्षी दाबके यांनी केले असून होनराज मावळे यांनी संगीत दिले आहे. सुधीर अंबी यांनी नेपथ्य केले आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.