Type Here to Get Search Results !

बिदरच्या उच्चशिक्षित तरुणाचा पुण्यातील पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; दोन्ही हात मोडले

 

पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): येरवडा (yerwada) येथील बंडगार्डन पुलावरून (bundgarden bridge) एका तरुणाने नदीपात्रात उडी मारल्यामुळे तो गंभीर जखमी (serioudly injured) झाला आहे. तो सिमेंटच्या ब्लॉकवर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले असून, डोक्याला मार लागला.

परम चिदंबर भुरे (वय 24, रा. आनंदवाडी, ता. भालकी, जि. बिदर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27 जानेवारी 2023) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, परम भुरे हा बीएस्सी उत्तीर्ण असून, तो एक महिन्यापूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात आला आहे. येरवड्याकडे जाणाऱ्या बंडगार्डन पुलावर आलेल्या या तरुणाने कठड्यावर चढून नदीपात्रात उडी मारली. प्रत्यक्षदर्शी रोहित पाडळे (rohit padale) हे तरुणापासून काही अंतरावर होते. त्यांना फोन आल्यामुळे ते दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून मोबाईलवर बोलत होते. तेवढ्यात काही अंतरावर असलेल्या एका तरुणाने पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाडळे यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) 100 क्रमांकावर फोन केला. तसेच, रुग्णवाहिकेसाठी (ambulance) 108 क्रमांकावर घटनेची माहिती दिली.

 

त्यावरून पर्णकुटी चौकीतील पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव तसेच, कोरेगाव पार्क (koregan park) पोलीस ठाण्यातील कर्मचारी विठ्ठल वीर आणि वेताळ हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत रुग्णवाहिकाही तातडीने घटनास्थळी पोचली. त्यांनी तरुणाला ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना तरुणाच्या खिशातून आधारकार्ड मिळाले. तसेच, त्याच्या मोबाईलवरून वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पाडळे यांच्या सतर्कतेमुळे परम भुरे याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले. त्याच्यावर ससून रुग्णालयात (sasun hospital) उपचार सुरू आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.