Type Here to Get Search Results !

टेमघर धरण दुरुस्ती प्रकल्पाला लवकरच शासनाकडून मान्यता मिळणार ...

 

पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीला तब्बल 700 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळणार आहे. (Repair of Temghar Dam in Khadakwasla Dam Chain Project will soon get administrative approval of Rs 700 crore.)

 

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले होते. या धरणाची क्षमता 3.71 अब्ज घन फूट (टीएमसी) आहे. टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले आणि तेव्हापासून धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली.

 

मात्र, पाणी साठविण्यास सुरुवात केल्यावर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच टेमघर धरणाला गळती सुरू झाली. सन 2016 मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागली. या पाणी गळतीचे प्रमाण प्रतिसेकंद तब्बल 2500 लिटर एवढे होते.

 

टेमघर धरणाच्या कामाला सन 1997 मध्ये सुरुवात झाली होती. सन 2000 मध्ये या धरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले होते. फक्त ग्राऊटिंगचे काम करणे शिल्लक होते. मात्र, त्याच वेळी वनविभाग आणि जलसंपदा विभागामध्ये धरणाच्या जागेवरून वाद होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर सन 2010 मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. त्या वेळी ग्राऊटिंगचे काम न करताच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला.

 

परिणामी, काही वर्षांतच हे धरण गळू लागले. दरम्यान, सन 2017 पासून गळतीप्रतिबंधक कामांना सुरुवात झाली असून, धरणाची 90 टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे. मात्र, धरणाच्या मजबुतीसाठी दीर्घकालीन कामे करावी लागणार आहेत. त्याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळेल.

 

टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची किंमत वाढल्यामुळे या प्रकल्पासाठी सुप्रमा आवश्यक आहे. सुप्रमा म्हणजे शासनाने एखादे काम हाती घेण्यासाठी दिलेली प्रशासकीय मान्यता. या मान्यतेमध्ये प्रामुख्याने कामाचे नाव आणि त्यासाठी किती खर्च करावा लागणार याचा उल्लेख असतो. मंजूर झालेला मागील सुप्रमा साधारण दहा वर्षापूर्वी मिळाला होता. मात्र मागील सुप्रमामध्ये धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची तरतूद नव्हती. परिणामी, या धरणाच्या उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी सुप्रमा आवश्यक आहे. 

 

हे धरण बांधण्यासाठी 252 कोटी रुपयांचा खर्च आला होता, तर दुरुस्तीसाठी तब्बल 700 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

“धरणाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत 500 कोटींचा खर्च करण्यात आला असून, सुप्रमा मिळाल्यानंतर उर्वरित 200 कोटी रुपयांमधून मजबुतीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.”असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी व्यक्त केला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.