पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर रित्या (illegal) शेकडो कोटींचं कर्ज दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड या भागातील द सेवा विकास सहकारी बँकेचा (The Seva vikas Sahakari Bank) माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने (enforcement directorate) छापेमारी (raid) केली आहे. (ED raid on The Seva vikas Sahakari Bank)
या बॅंकेने म्हणजे या बॅंकेच्या संचालकांनी तब्बल 124 बनावट कर्जांचे (fake loans) प्रस्ताव तयार केले होते. यातून त्यांनी 430 कोटी रूपयांचे कर्ज कर्ज मिळण्याची पात्रता (eligibility) नसतांनाही विविध व्यक्ती आणि संस्थांना बेकायदेशीररित्या दिले.
त्यामुळे कोणतेही निकष न तपासता देण्यात आलेल्या या कर्ज प्रकरणावरून बँकेचा माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. या व्यवहारामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर (rajesh jadhwar) यांनी 2020 मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट (audit) केले होते. त्यानंतर हा घोटाळा (fraud) उघडकीस आला.
या प्रकरणात पिंपरी (pimpri) पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद (amar mulchand) यांच्यासह पाच जणांना अटक (arrest) केली होती. अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले.
त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने (RBI) प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. सीआयएसएफचे (CISF) जवान आणि पोलीस बंदोबस्त तैनात करून ईडीने ही छापेमारी सकाळपासून सुरू केली होती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84