Type Here to Get Search Results !

मोबाईलवर पार्टटाईम जॉब करून दिवसाला २ ते ३ हजार रुपये कमावण्याचे आमिष पडले महागात

 

पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब (part time job) आणि भरघोस कमिशनचं (commission) आमिष दाखवून तिघांनी मिळून पुण्यातील महिलेची 19 लाखांना फसवणूक (fraud) झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील मार्केटयार्डमध्ये (marketyard) राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (complaint) दिली आहे. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रँडस्टॅन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चेन्नई या कंपनीचे मालक, www.kyktrips.com या कंपनी चे मालक तसेच मे. डिवाइन एंटरप्राइजेसचे मालक सुरेश भगोरा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील एका आरोपीने फिर्यादी महिलेला त्यांच्या मोबाईलवर पार्टटाईम जॉब करून दिवसाला 2500 ते 3000 रुपये कमावण्याचे आमिष दाखवले. नोकरीची गरज असल्यामुळे या अमिषाला ती महिला बळी पडली.

आरोपीने त्यानंतर महिलेला whatsapp वर माहिती पाठवून kyktrips.com या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती भरायला सांगितली. आरोपींनी काम सुरू झाल्याचे सांगत फिर्यादी यांना टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स्चे रेटिंग आणि रिव्हू करण्याचे काम दिले. आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी ते काम पूर्ण केले टास्क पूर्ण केला.

दरम्यान, सुरेश भगोरा याने फिर्यादी यांना त्याच्या यूपीआय आयडीवर 5000 हजार भरायला सांगितले. फिर्यादींना कामामध्ये मोठी रक्कम मोबदला म्हणून मिळते आहे असे सांगत अनेक वेळा पैसे उकळले. आरोपींनी त्या महिलेकडून 19,55,171 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. एवढी मोठी रक्कम गेल्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात भारतीय दंडात्मक पोलीस ठाण्यात 419, 420 तसेच आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.