पुणे, दि.
30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): देशातील नववी व मध्य रेल्वेची पहिली ठरणाऱ्या
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे (mumbai
to solapur train vande bharat express) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या
हस्ते 11 फेब्रुवारी 2023 ला मुंबईत होणार आहे. सोलापूर
ते मुंबई ही वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर स्थानकावरून दुपारी 3 वाजता मुंबईच्या दिशेने सुटेल. तिला आॅनलाइनच्या माध्यमातून
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (Chatrapati
Shivaji Terminal- CST) येथून पंतप्रधान हिरवा झेंडा (Green
Flag) दाखवतील.
ही एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून (pune station) धावणार आहे. वंदे
भारत एक्स्प्रेसमुळे पुणेकरांना रेल्वेच्या प्रवासाची वेगळी अनुभूती मिळणार आहे. मोदी
हे 10 फेब्रुवारीला मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन
(mumbai to solapur train vande bharat express inauguration)
करणार आहेत. यावेळी मुंबई ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसचे (Mumbai
to sainagar shirdi train vande bharat express) ते उद्घाटन
करतील. मुंबई ते सोलापूरदरम्यान रेल्वे मार्ग ताशी 110
किमीचा असल्याने वंदे भारत एक्स्प्रेस ताशी 110 किमीने
धावेल.
सोलापूरहून वंदे भारत एक्स्प्रेस च्या वेळा
पुढीलप्रमाणे असतील – (Mumbai
to Solapur Train Vande Bharat Express route and
timings)
सोलापूर-पुणे-मुंबई
सोलापूर - सकाळी 6:05 ला निघेल.
पुणे –
सकाळी 9 ला पोहचेल.
मुंबई
– दुपारी 12:30 पोहचेल आणि
मुंबई-पुणे-सोलापूर
मुंबई-
दुपारी 4:10 ला तिथून निघेल.
पुणे (परत)
– 7:30 ला पोहचेल.
सोलापूर
(परत) – 10:40
ला पोहचेल.
ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असेल. मुंबईहून बुधवारी
व सोलापूरहून गुरुवारी ही एक्स्प्रेस धावणार नाही. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, लोणावळा,
पुणे व कुर्डुवाडी आदी स्थानकांवर थांबा दिला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून सिकंदराबाद-पुणे धावणाऱ्या
शताब्दी एक्सप्रेसचा (Secunderabad-Pune
Shatabdi Express) रेक फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत
बदलण्यात येणार आहे. घोरपडी (ghorpadi) येथे अद्याप पिट
लाईन बांधून तयार न झाल्याने सिकंदराबाद येथेच वंदे भारत एक्सप्रेसच्या रेकची
देखभाल-दुरुस्ती (repairs and maintenance) केली जाणार
आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84