याचे कारण असे कि हा रस्ता
केल्याने वाहतूक कोंडी कमी होणार नाही, अपघातांचे प्रमाण वाढेल, खांडेकर चौक येथे भुयारी मार्ग केल्याने सेनापती बापट रस्त्यावर कोंडी
होईल. त्यामुळे रस्त्याच्या प्रकल्प अहवालास मान्यता देण्यापूर्वी त्याचा
पुनर्विचार करण्याची मागणी पुणे महापालिकेच्या बालभारती रस्ता तज्ञ समितीचे
प्रशांत इनामदार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रकल्पाबाबत पुढील आक्षेप इनामदारांनी केले आहेत-
· बापट रस्त्याकडून विधी महाविद्यालय रस्ता, पौड रस्ता, कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बालभारती रस्ता उपयोगी पडू शकेल.
याच्या वाहतूक सर्वेक्षणाची आकडेवारी अहवालात नाही.
· त्यामुळे नव्या रस्त्याचा उद्देश सफल होईल याची कोणतीच ठोस हमी
मिळालेली नाही.
· 2050 मध्ये बालभारती पौड फाटा रस्त्याचा वापर 46 टक्केच वाहने वापर करतील, त्यामुळे उपयुक्ततेवर
प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
· या रस्त्याची रचना पाहता वेग मर्यादा प्रति तास 40 किलोमीटर वेगाने
जाणाऱ्या वाहनासाठी योग्य आहे. यापेक्षा अधिक वेगाने गेल्यास अपघात वाढण्याची
शक्यता आहे.
· टेकडीवरील दाट जंगलात रस्ता उन्नत केला तरीही खांबांसाठी खोदकाम
करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री वापरल्याने पर्यावरणाची हानी होईल.
· बालभारती रस्त्याकडून खांडेकर चौकाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग
केल्याने बापट रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढेल.
· बालभारती रस्त्याच्या मूळ आराखड्यात उड्डाणपुलाचा समावेश होता.
त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होणार असल्याने तेव्हा पूल न बांधला नाही आता पुन्हा
उड्डाणपूल बांधण्याचे ठरविणे अनाकलनीय आहे.
· या प्रकल्पामुळे पौड रस्ता, केळेवाडी चौक, सेनापती बापट
रस्ता यासह इतर रस्ते प्रभावित होणार. या परिणामाचा विचार केला नाही.
“पुणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार
करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला होता. या सल्लागार कंपनीने बालभारती पौड फाटा हा
रस्ता करावा हा अभिप्राय दिला आहे. पण त्यामध्ये गंभीर बाबींचा विचार व अभ्यास
केलेला नाही. सल्लागारांवर अंध विश्वास ठेवून प्रकल्प अहवालाप्रमाणे अडीचशे कोटी
रुपये खर्चून बालभारती रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक फार मोठी घोडचूक
ठरेल. त्यामुळे आक्षेपांचा विचार करावा.” अशी मागणी इनामदार यांनी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84