Type Here to Get Search Results !

व्हाट्स अँप चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत पोलिसासमोरच गोळीबार; सांस्कृतिक पुण्यातील घटना

 

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  व्हॉट्स ॲप ग्रुपवर (Whatsapp group chat) झालेल्या चॅटिंगवरून (chatting) झालेल्या बाचाबाचीत एका बांधकाम व्यावसायिकाने (builder) एकावर गोळीबार (firing) केल्याची धक्कादायक घटना घडली. यात रमेश राठोड (रा. वारजे, पुणे) हे जखमी झाले. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना सिंहगड रस्ता (sinhagad road) येथे घडली आहे. विशेष म्हणजे गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सिंहगड पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पवार, देवा राठोड व रमेश राठोड यांच्यासह अन्य काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी (suncity) भागातील योगीराज ऑटो सेंटरमध्ये (yogiraj auto centre) चर्चा करीत होते. यातील देवा राठोड यांनी त्यांच्या समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर संतोष पवार यांच्याबद्दल काहीतरी लिहिले होते. यावरून संतोष पवार व देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली.

 

या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडल्याने संतोष पवार यांनी कमरेला असणारी पिस्तूल (gun) काढून रमेश राठोड यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी (injured) झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

संतोष पवार हे बांधकाम व्यावसायिक असून ते जमीन विकसक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल असून त्यांच्या संरक्षणासाठी एक पोलीस कर्मचारी सुद्धा आहे. मात्र असे असतानाही त्यांनी रमेश राठोड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.