Type Here to Get Search Results !

"स्टार मेकर" मोबाईल ॲप वरुन पुण्यातील तरूणाचं सेक्सटॉर्शन; धमकी देत उकळले पैसे

 

पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात एका तरुणाला ऑनलाईन ॲप वरुन झालेली ओळख चांगलीच पडली महागात आहे. पुन्हा एकदा सेक्सटॉर्शन चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तरुणीकडून एका तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 32 वर्षीय तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे (वय-30, रा. कळंबोळी, नवी मुंबई) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे यांची ओळख "स्टार मेकर" या मोबाईल ॲप वरुन झाली होती. प्रीतीने फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या नंतर तिने फिर्यादीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याची फसवणूक केली.

या पुढे जाऊन प्रीतीने या तरुणाकडे वेळो-वेळी 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच त्या तरुणाला तुझ्या घरी आणि ऑफिस मध्ये हे सगळं प्रकरण सांगून बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. पैसे नाही दिले तर आत्महत्या करेल, असे देखील वारंवार धमकावले.

या नंतर फिर्यादीने या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. भारतीय दंडात्मक कलम 384, 385, 417, 500 आणि 506 या अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.