Type Here to Get Search Results !

झाडे तोडण्यास मनाई करणाऱ्या महिलेचा शिवीगाळ करत विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मोकळ्या जागेत लावलेल्या अशोका व इतर प्रजातींच्या झाडांची जेसीबीच्या साहाय्याने कत्तल करणाऱ्या दोघां इसमांना एका महिलेने विरोध केला तर तिलाही अश्लील शिवीगाळ करून धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A woman objected two people from killing trees with the help of JCB and was also threatened with obscene abuse and molested.)

हा प्रकार मंगळवारी (ता. 17 जानेवारी 2023) सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिल्याने सनी दत्तात्रय चांदेरे (वय-30) व जेसीबी ऑपरेटर दीपक कुमार (दोघेही राहणार सुसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुस गावातील सर्व्हे क्रमांक 212, प्लॉट क्रमांक 34 येथे फिर्यादी यांच्या वडीलांच्या पत्र्याच्या खोल्या आहेत. या खोल्यांच्या पाठिमागे मोकळ्या जागेवर अशोकाची, झाडे लावलेले आहेत. मंगळवारी (ता. 17 जानेवारी 2023) सकाळी आरोपी चांदेरे हा एमएच. 12, ईसी. 1170 क्रमांकाचा जेसीबी घेऊन आला. जेसीबीच्या साहाय्याने तो झाडे तोडू लागला. तेंव्हा फिर्यादी यांनी ‘तुम्ही झाडे काढू नका’ असे म्हणत त्यास विरोध केला.

त्या जेसीबी समोर थांबल्या तेंव्हा चांदेरे याने ''तु पण तुझ्या बापासारखीच आहेस, तुझे काय करायचे आहे ते करतो'' असे म्हणुन अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या छातीजवळ धरून ओढत विनयभंग केला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.