(The 56th Annual Nirankari Sant Samagam of Maharashtra will conclude in Aurangabad from 27th to 29th january 2023.)
पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत
तसतसे निरंकारी भक्तगणांकडून समागमाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या विशाल संत
समागमाची पूर्वतयारी मागील 25 डिसेंबर 2022 पासून विधिवत रूपात सुरु झाली आणि तेव्हापासून केवळ औरंगाबादच नव्हे तर
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून हजारोंच्या संख्येने
निरंकारी भक्तगण व निरंकारी सेवादलाचे महिला व पुरुष स्वयंसेवक समागम स्थळावर येऊन
मोठ्या श्रद्धेने, आवडीने आणि समर्पणाच्या भावनेने आपल्या
निष्काम सेवा निरंतर अर्पण करत आहेत.
विदित
असावे, की औरंगाबादमधील
बिडकीन स्थित डीएमआयसीच्या मैदानांवर दिनांक 27 ते 29 जानेवारी, 2023 दरम्यान संत निरंकारी मिशनच्या
आध्यात्मिक प्रमुख परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी आणि त्यांचे जीवनसाथी
निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात हा संत समागम आयोजित होत आहे.
महाराष्ट्राचा
वार्षिक निरंकारी संत समागम ला पिंपरी-चिंचवड मधून सुमारे 10,000 हुन अधिक भाविक भक्तजन रवाना होणार आहेत अशी
माहिती मिशनचे पुण्याचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. महाराष्ट्राचा
वार्षिक निरंकारी संत समागम अनेकतेत एकता, भक्ती, प्रेम व मानवता यांचा एक अनुपम संगम असतो ज्यामध्ये केवळ निरंकारी भक्तगणच
नव्हे तर ईश्वरामध्ये आस्था बाळगणारा प्रत्येक मनुष्य सहभागी होऊन मिशनच्या दिव्य
शिकवणूकीतून प्रेरणा घेऊन स्वत:ला धन्य समजत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी
या संत समागमामध्ये विविध संस्कृती, सभ्यता यांचा विलोभनीय
मिलाफ झाल्याचे सुंदर दृश्य साकार होईल ज्यातून अलौकिक आनंदाची अनुभूती
प्रत्येकाला प्राप्त होऊ शकेल.
समागम
स्थळावर स्वच्छतेविषयक सेवा असो, ट्रॅक्टरची सेवा असो, राजमिस्त्रींची सेवा असो,
लंगरची सेवा असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सेवा असो समस्त
भक्तगण त्यामध्ये हिरीरिने भाग घेऊन आपले भरपूर योगदान देत आहेत. यामध्ये बालक
असोत, युवावर्ग असो किंवा वयस्कर मंडळी असोत सर्वांमध्ये एक
नवऊर्जा व उत्साहाचा संचार झाल्याचे चित्र दिसत आहे. संत समागमाच्या सेवेत भाग
घेता आला याबद्दल हे भक्तगण स्वत:ला भाग्यवान समजत असून सद्गुरु माताजींच्या प्रति
कृतज्ञतेचे भाव व्यक्त करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84