Type Here to Get Search Results !

पुणे शहरात मातृ पितृ पूजन दिन उत्साहात साजरा; व्हॅलेंटाईन डे मात्र सुकला

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): 14 फेब्रुवारी (14th February) या दिवसाचे महत्व कोणालाही विचारले तर अनेकजण आज ‘व्हॅलेंटाईन दिवस’ (Valentine day) आहे, प्रेम दिवस आहे असे सांगतात. मात्र, या सर्वांसोबतच मातृ-पितृ पूजन दिवस (Matru pitru pujan diwas) हेही आजच्या दिवसाचे महत्व आहे. आज ज्याप्रमाणे प्रेमदिवस साजरा करतात त्याप्रमाणेच अनेकजण आपल्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांचा आशिर्वाद घेत मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करतात.

“मातृ देवो भवः... पितृ देवो भवः” असा महान संदेश समस्त मानवतेस देणाऱ्या भारतातच आई-वडिलांना त्यांच्या उतरल्या वयात वृद्धाश्रमात टाकून दिले जात असल्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे.

जे आई-वडील आपल्या अपत्यांना खरे निःस्वार्थ प्रेम करतात, त्यांची अशी दुर्दशा होत आहे. तर दुसरीकडे पाश्चात्य अंधानुकरण करत भारताची युवापीढी 14 फेब्रुवारीला तथाकथित “प्रेम-दिवस वैलेंटाईन डे" म्हणून साजरा करत आहे, हे दुर्दैवी असल्याचे सुदर्शन चॅनल संपादक सुरेश चव्हाणके (Sudarshan Channel Editor Suresh Chavanke) यांनी म्हटले आहे.

समस्त हिंदू आघाडी (Samasta Hindu Aaghadi), युवा सेवा संघ (Yuva Seva Sangh), महिला उत्थान बालसंस्कार केंद्र (Mahila uthhan Bal Sanskar Kendra), श्री योग वेदांत सेवा समिती (Shree Yog Vedant Seva Samiti) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात 14 फेब्रुवारी रोजी “मातृ-पितृ पूजन दिवस” आयोजित करण्यात आला होता. यावेळी साध्वी रेखा दीदी (Sadhvi Rekha didi), समस्त हिंदू आघाडी संस्थापक मिलिंद एकबोटे (Samasta Hindu Aghadi founder Milind Ekbote) यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चव्हाणके म्हणाले की, दुदैवाने मातृ-पितृ भक्त गणपती, छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj), तसेच भक्त पुंडलिकास (Bhakta Pundalik) पूजनीय मानल्या जाणाऱ्या भारतातच अपत्यांना त्यांच्या आई-वडिलांप्रतीच्या कर्तव्याची आठवण करून देण्याकरिता शासनाला 'आई-वडील ज्येष्ठ नागरिकाचा निर्वाह कल्याण अधिनियम' कायदा (The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007) बनवावा लागला. म्हणूनच या विकृतीपासून देशास वाचवून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी पूज्य संत श्री आशारामजी बापू (Asharamji Bapu) यांनी 22 वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारीलाच “मातृ-पितृ पूजन दिवसा”ची सुरुवात करून एक अमूलाग्र क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले.

आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वभरात सर्वच धर्मांच्या लोकांद्वारे देखील हा दिवस प्रचंड उत्साहाने साजरा केला जात आहे. विविध राज्य सरकार, केंद्र सरकारच्या वरीष्ठ सदस्यांनी, माननीय संत समाजाने, सिनेमा सृष्टीतील कलाकारांनी देखील यांस शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.