Type Here to Get Search Results !

भाजपला भरीव कामगिरी करता न आल्यानेच आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर सुडात्मक कारवाई; पुण्यात निदर्शने

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Education Minister Manish Sisodia) यांच्या काल रात्री सीबीआयने (CBI) केलेल्या सुडात्मक अटकेविरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौक (Balgandharva Chowk) येथे झाशीच्या राणी पुतळ्यासमोर (Jhashichi Rani Statue) आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

"दिल्लीत शिक्षण क्रांती घडवून आणण्यात आप नेते व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये घडलेले अभूतपूर्व बदल हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. सरकारी शाळांचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना बदनाम करण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने मोठी मोहीम चालवली होती.  सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही आहे", अशी प्रतिक्रिया विजय कुंभार, आप राज्य संघटक (Vijay Kumhar, AAP State Organizer) यांनी दिली.

आरोग्य व शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टीने केलेल्या कामांची दखल देशातील जनतेने घेतली असून केवळ दहा वर्षात आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम आदमी पार्टीला भेटत आहे. त्यामुळे भाजप चिंताग्रस्त झाला आहे. भाजपला आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कधीच भरीव कामगिरी करता न आल्याने आकसाने आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री व इतर नेत्यांवर सुडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी खोटे आरोप करुन इडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करत आपच्या नेत्यांना अटकेत टाकत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर लावलेले आरोप खोटे असून केंद्र सरकारच्या (Central Government) दडपशाही विरोधात आम आदमी पार्टी संविधानिक मार्गाने जोरदार लढाई लढेल.

यावेळी आप राज्य संघटक विजय कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश, सुजीत अग्रवाल, प्रभाकर कोंढाळकर, मीरा बीघे, सीमा गुट्टे, वैशाली डोंगरे, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, घनश्याम मारणे, किरण कांबळे, शेखर ढगे, मनोज शेट्टी, अमोल काळे, राजू परदेशी, सहील परदेशी, फेबियन सॅमसन, किर्तीसिंग चौधरी, सतीश यादव, योगेश इंगळे, धनंजय बेनकर, मनोज फुलावरे, अनिल धुमाळ, निरंजन अडगले,  रोहन रोकडे, आबासाहेब कांबळे, अनिल कोंढाळकर, सर्फराज मोमीन, संजय कोणे, ललिता गायकवाड, ऋषिकेश मारणे, सुरेखा भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शंकर पोटघन, सुभाष कारंडे, अमोल मोरे, निखिल देवकर, आसिफ खान, समीर अरवाडे, सुनील वाल्हेकर, रमेश मते , शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, चंद्रकांत गायकवाड, तानाजी शेरखाने, प्रीती नीकाळजे, बीघे, बापू रणसिंग, श्रद्धा शेट्टी, मिताली वडवराव, मिलिंद ओव्हाळ, मनोज एरंडकर व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes        

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes      

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/      

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes      

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n      

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.