Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news,
पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नृत्य करताना वादग्रस्त हावभावांमुळे सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या नर्तिका गौतमी पाटील (lavani dancer gautami patil) हिला राष्ट्रवादीच्या (NCP) मंचावर बोलावू नका, अशी तंबीच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तिला आपल्या मंचावर नृत्यासाठी कुणीही बोलावू नये, अशी ताकीदच अजित पवार यांनी दिली. (gautami patil apologizes to ajit pawar)
आता अजितदादांच्या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी (apology) मागितली आहे. नृत्यावर बंदी घातल्यानंतर खुद्द गौतमीनेच पुढे येऊन प्रतिक्रिया देताना ती म्हणाली,“अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. पण अजूनही काही लोक मला ट्रोल करतायेत. ते कोण लोक आहेत, हे मला माहिती नाही. माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही?”
“याआधी माझ्याकडून काही चुका झाल्या. मात्र लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासून माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी अश्लील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा,” असंही गौतमीने म्हटलं आहे.
अजितदादांना टोला लगावतांना गौतमी म्हणाली कि,”एवढ्या दिवस मी शांत होते... जाऊदे म्हणत होते... कुणीकाही बोललं तर मी उत्तर देत नसायचे. पण कदाचित माझी वाढती लोकप्रियता त्यांच्या डोळ्यात खुपत असेल. माझे काही जुने व्हिडीओ लोक सोशल मीडियावर पोस्ट करतात. मग मला खडसावताना हे ही सांगायला हवं की जुने व्हिडीओ टाकू नका.”
राज्यात लावण्यांच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार होतायेत. आयोजनात राष्ट्रवादीच्या पदाधिकारीच आघाडीवर असतात, अशी तक्रार राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलच्या पदाधिकारी लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे (Lavanisamaragji Megha Ghadge, office bearer of Nationalist Cultural Cell) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेताना असे कार्यक्रम आयोजित न करण्याच्या तात्काळ सूचना अजित पवार यांना केल्या.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84