Type Here to Get Search Results !

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यावर पुण्याची “माय मराठी” कविता गाजली

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) कवी कट्ट्यावर (Kavi Katta) पुण्याची माय मराठीकविता गाजल्याचे पाहायला मिळाले. वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत (Rashtra Pita Mahatma Gandhi Sahitya Nagari) दिनांक शुक्रवार दि. 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रा. देवीदास सोटे (Prof. Devidas Sote) कविकट्टा काव्यमंचावर पुण्याच्या वारजे येथील कामगारभूषण कवी राजेंद्र वाघ (Poet Rajendra Wagh) यांच्या "माय मराठी" या कवितेची निवड करण्यात आली होती.

 

या सभामंडपात माय मराठीकविता सादर करून राजेंद्र वाघ यांनी सभागृहात प्रचंड टाळ्या मिळवून रसिकांची दाद मिळवली. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी गुणवंत पाटील (Gunvant Patil), जितेंद्र लाड (Jitendra Lad), डॉ. गिरीश वैद्य (Dr. Girish Vaidya), बाळासाहेब गीरी (Balasaheb Giri), सीताराम नरके (Sitaram Narake) यांच्या उपस्थितीत वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले (Collector of Wardha Rahul Kardile), कविकट्टा समितीचे प्रमुख राजन लाखे (Rajesh Lakhe) आणि प्रसाद देशपांडे (Prasad Deshpande) यांचे हस्ते स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन राजेंद्र वाघ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा थोटे (Varsha Thote) यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुरा इंदापवार (Madhura Indapawar) यांनी मानले.

 

या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद दत्ता मेघे (Datta Meghe) यांनी, तर संमेलनाचे अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (Justice Narendra Chapalgaonkar) उपस्थित होते. याप्रसंगी मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे (Bharat Sasane), अखिल भारतीय मराठी महामंडळ अध्यक्षा उषा तांबे (Usha Tambe), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar), कार्याध्यक्ष प्रदीप दाते (Pradeep Date) आणि इतर मान्यवर आचार्य विनोबा भावे सभामंडपातील व्यासपीठावर उपस्थित होते.

 

राजेंद्र वाघ हे कामगारभूषण पुरस्कार विजेते कवी असून नोकरी करून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचे योगदान असते. कामगार साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदी, तर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्षपदी आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या कोषाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.